एक्स्प्लोर

ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबद्ध

ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. 65 वर्षीय हरीश साळवे ब्रिटनमधील आर्टिस्ट कॅरोलिन ब्रॉसार्ड यांच्याशी विवाहबद्ध झाले.

लंडन : ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. 28 ऑक्टोबर म्हणजेच काल त्यांनी लंडनमधील चर्चमध्ये कॅरोलिन ब्रॉसार्डशी विवाहबद्ध झाले. हे या दोघांचंही दुसरं लग्न आहे. 65 वर्षीय हरीश साळवे यांनी या वर्षाच्या सुरुवातीला पत्नी मीनाक्षी साळवे यांना घटस्फोट देऊन 38 वर्षांचा संसार मोडला. हरीश-मीनाक्षी साळवे यांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत.

ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबद्ध

कॅरोलिन 56 वर्षांच्या असून त्या व्यवसायाने कलाकार आहेत. त्यांना एक मुलगीही आहे. एका कला प्रदर्शनात हरीश साळवे आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड यांची भेट झाली होती. यानंतर या दोघांच्या भेटी वाढल्या. नंतर घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनीही बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला.

ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबद्ध

हे लग्न ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लंडनमधील चर्चमध्ये पार पाडलं. चर्चमधील या छोटेखानी विवाह समारंभात केवळ 15 लोक सहभागी झाले होते. ज्यात दोघांचे कुटुंबीय आणि काही खास मित्रपरिवार सहभागी होता.

हरीश साळवे यांची कारकीर्द हरीश साळवे यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्यांचे वडील एन के पी साळवे व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट होते तर आई अमृती साल्वे डॉक्टर होत्या. परंतु हरीश साळवे यांनी वकील बनण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्या हाताखाली काम केलं होतं.

ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबद्ध

हरीश साळवे हे देशातील प्रख्यात वकील आणि ब्रिटनमधील क्वीन्स कौन्सिल आहेत. भारत सरकारने सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. वकिलीमध्ये त्यांची कारकीर्द जबरदस्त होती. त्यांनी अनेक हायप्रोफाईल खटले लढले आणि जिंकलेही. यामध्ये कुलभूषण जाधव, रतन टाटा-सायरस मिस्री वाद, सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण, वोडाफोनचा कर वाद यांसारख्या मोठ्या खटल्यांचा समावेश आहे. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या विनंतीवरुन त्यांनी पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद असलेल्या कुलभूषण जाधव यांचा खटला लढला. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी केवळ एक रुपया मानधन घेतलं होतं.

ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबद्ध

हरीश साळवे यांना ब्रिटन आणि वेल्सच्या न्यायालयात महाराणीचे वकील म्हणूनही नियुक्त केलं आहे. ज्यांनी वकिलीमध्ये कौशल्य प्राप्त केलंय अशाच वकिलांना हा मान मिळतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget