एक्स्प्लोर

Osama Bin Laden Son Hamza : लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!

Osama Bin Laden Son Hamza : हमजाला 'प्रिन्स ऑफ टेरर' म्हटले जाते. MNF ने म्हटले आहे की 2021 मध्ये तालिबानच्या आगमनानंतर अफगाणिस्तान दहशतवादी गटांचे प्रशिक्षण केंद्र बनले आहे.

Osama Bin Laden Son Hamza : ब्रिटनमधील 'मिरर' या इंग्रजी वृत्तपत्राने एका गुप्तचर अहवालाचा हवाला देत कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा (Osama Bin Laden Son Hamza) बिन लादेन जिवंत असल्याचा दावा केला आहे. हमजा अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अल कायदाचे नेटवर्क उभारण्यात गुंतला आहे. यापूर्वी 2019 मध्ये अमेरिकेने दावा केला होता की, हमजाचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही 14 सप्टेंबर 2019 रोजी याची पुष्टी केली होती. मिररच्या वृत्तात म्हटले आहे की, हमजा आणि त्याचा भाऊ अब्दुल्ला बिन लादेन अफगाणिस्तानमध्ये गुप्तपणे अल कायदाचे नेटवर्क चालवत आहे. तालिबानविरोधी लष्करी संघटना नॅशनल मोबिलायझेशन फ्रंट (एनएमएफ) च्या अहवालाचा हवाला देत मिररने हा दावा केला आहे. एनएमएफने आपल्या अहवालात हमजा आणि त्याच्या साथीदारांची माहिती दिली आहे.

हमजा 450 स्नायपरच्या संरक्षणात 

NMF नुसार, हमजा उत्तर अफगाणिस्तानात लपला आहे. त्याच्या सुरक्षेसाठी 450 स्नायपर नेहमीच तैनात असतात. हमजाला 'प्रिन्स ऑफ टेरर' म्हटले जाते. MNF ने म्हटले आहे की 2021 मध्ये तालिबानच्या आगमनानंतर अफगाणिस्तान दहशतवादी गटांचे प्रशिक्षण केंद्र बनले आहे. रिपोर्टनुसार, हमजा पंजशीरच्या दारा अब्दुल्ला खेल जिल्ह्यात आहे. त्याच्या सुरक्षेसाठी येथे अरब आणि पाकिस्तानी तैनात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अल कायदा पुन्हा एकदा उदयास येत आहे. पाश्चात्य देशांवर भविष्यात हल्ले करण्याच्या तयारीत आहे. NMF ने दावा केला आहे की अल कायदा व्यतिरिक्त 21 इतर दहशतवादी संघटनांची प्रशिक्षण केंद्रे देखील अफगाणिस्तानात सुरू आहेत.

23 वर्षांपूर्वी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला होता

11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमाने पाडली. दहशतवाद्यांनी 4 विमानांचे अपहरण केले होते. यापैकी 3 विमाने अमेरिकेतील 3 महत्त्वाच्या इमारतींवर एकामागून एक कोसळली. पहिला अपघात रात्री 8:45 वाजता झाला. बोईंग 767 हे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरवर वेगाने आदळले. 18 मिनिटांनंतर, दुसरे बोईंग 767 इमारतीच्या दक्षिण टॉवरवर आदळले. तर एका विमानाची अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणजेच पेंटागॉनशी टक्कर झाली. चौथे विमान शेतात कोसळले. 9/11 च्या हल्ल्यात 93 देशांतील 3 हजार लोक मारले गेले. या हल्ल्याचा मास्टरमाईंड अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन होता. 2 मे 2011 रोजी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे यूएस नेव्ही सील कमांडोंच्या कारवाईत ओसामा मारला गेला.

अफगाणिस्तानात अल कायदाची 10 प्रशिक्षण केंद्रे

मिररच्या वृत्तानुसार, अल कायदाने अफगाणिस्तानमध्ये 10 प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. इथे तो पाश्चिमात्य देशांचा द्वेष करणाऱ्या वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशीही हातमिळवणी करत आहे. अल कायदाचा म्होरक्या हमजा आपला बहुतांश वेळ काबूलपासून 100 किमी दूर असलेल्या जलालाबादमध्ये घालवतो. रिपोर्टनुसार, 34 वर्षीय हमजाचे तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत. तालिबानी नेते त्याला वेळोवेळी भेटत असतात. रिपोर्टनुसार, तालिबान हमजाच्या कुटुंबाला सुरक्षाही पुरवत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Ministers List : भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर, ‘या’ नेत्यांना संधीEVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूNagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
मोठी बातमी! विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला
विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला! 
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्यकुमार यादवचीही बॅट तळपली,
Embed widget