एक्स्प्लोर

हाफिज सईदच पाकिस्तानचा पंतप्रधान, तारिक फतेहंचा टोमणा

नवी दिल्ली: जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि लष्कर-ए-तय्यबाचा संस्थापक हाफिज सईदच पाकिस्तानचा खरा पंतप्रधान आहे. तसेच सध्याच्या भौगोलिक परिस्थितीत पाकिस्तानचं अस्तित्वच चुकीचं आहे, अशी फटकेबाजी पाकिस्तानमध्ये जन्मलेले, मात्र सध्या कॅनेडाचे नागरिक असलेले प्रसिद्ध लेखक तारिक फतेह यांनी शनिवारी केली. कराचीमध्ये जन्मलेल्या फतेह यांनी एका खासगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ही टोलेबाजी केली. ते म्हणाले की, ''मला माहित नाही की, तुम्ही भारतीय इतके गंभीर का असता. तुम्हाला देश कोण चालवतं हेच कळलं नाही. जमात-उद-दावाच्या सैनिकांनी 10 महिन्यात 30 लाख बंगाली नागरिकांची हत्या केली. तसेच बलुच तरुणांनाही विमानातून फेकत आहेत. याशिवाय तरुणींवरही अनन्वित अत्याचार होत आहेत.'' ते पुढे म्हणाले की, '' जेव्हा 1971च्या युद्धातील 90 हजार पाकिस्तानी युद्धबंदींची इंदिरा गांधींनी सुटका केली, तेव्हा त्यांना 1973 ते 1975 दरम्यान बलुचिस्तानमध्ये पुन्हा निरपराधांचे हत्याकांड घडवून आणण्यासाठी तैनात करण्यात आले.'' 'पाकिस्तान देश नव्हे विनोद' पाकिस्तानने स्वत:ला अनेक नावे लावून घेतलेली आहेत. हा आता देश राहिला नाही, तर तो आपल्या सर्वांसोबत केला गेलेला एक विनोद असल्याचेही, ते यावेळी म्हणाले. बलुचिस्तानचा भूभाग पाकिस्तानी सैन्याने बळकावला यावेळी बोलताना बालुचिस्तानच्या स्वातंत्र्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की बलुचिस्तान स्वतंत्र होता, मात्र 1947 साली पाकिस्तानी सैन्याने जबरदस्तीने हा भाग बळकावला आहे. हाफिज सईदच पाकिस्तानचा पंतप्रधान तसेच त्यांनी यावेळी पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ आणि पाकिस्तानी सैन्यदल प्रमुख राहिल शरीफ यांच्या कार्यप्रणालीवरही हल्ला चढवला. ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नवाज शरीफ नसून हाफिज सईद आहे, तर हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सैयद सलाउद्दीन हाच पाकिस्तानचा संरक्षण मंत्री आहे. तारिक फतेह कोण आहेत? फतेह हे एक उदारमतवादी लेखक असून मुस्लीम कॅनेडियन काँग्रेसचे संस्थापक आहेत. कराचीमध्ये जन्मलेले फतेह सध्या कॅनेडामध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या तीक्ष्ण लेखणीमुळे ते सदैव पाकिस्तानातील कट्टर विचारांच्या मुस्लीम संघटनांचे लक्ष्य असतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Rally | प्रचाराचा शेवटचा दिवस, महायुतीसाठी श्रीकांत शिंदेंचा रोडशोSanjay Shirsat on Kalicharan : कालीचरण यांच्या सभेचा आणि माझा काहीही संबंध नाहीSaroj Patil speech Kagal : Hasan Mushrif नक्की गाडला जाणार, शरद पवारांच्या बहिणीचा हल्लाSharad Pawar Full Speech Baramati| पुढच्या पिढीची गरज, त्यासाठी युगेंद्रला निवडून द्या; शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget