एक्स्प्लोर

हाफिज सईदच्या नाड्या आवळल्या, अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव

हाफिजवर कारवाईसाठी राष्ट्र संघाकडूनही पाकिस्तानवर दबाव वाढू शकतो. त्यामुळे हाफिजने अटक टाळण्यासाठी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली आहे.

इस्लामाबाद : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदच्या नाड्या आता चांगल्याच आवळल्या आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचं एक शिष्टमंडळ पाकिस्तान दौरा करणार आहे. या दौऱ्यात हाफिजवर कारवाईसाठी राष्ट्र संघाकडूनही पाकिस्तानवर दबाव वाढू शकतो. त्यामुळे हाफिजने अटक टाळण्यासाठी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. ‘भारत आणि अमेरिकेच्या दबावामुळे आपल्याला अटकेची शक्यता असल्याचे,’ त्याने या यचिकेत म्हटलं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाफिज सईद आणि त्याच्याशी संबंधित संस्थांची संपत्ती जप्त केलीच जाईल, याचा पुनरुच्चार केला. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची 1267 सेक्शंसचं एक शिष्टमंडळ या आठवड्यात पाकिस्तानचा दौरा करणार आहे. हे शिष्ठमंडळ पाकिस्तान आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे सर्व नियम योग्य प्रकारे पाळतो की नाही, याची पाहाणी करणार आहे. दोन दिवसीय हा दौरा गुरुवारपासून सुरु होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हाफिजला अटकेची भीती सतावत असून, अटकपूर्व जामीनासाठी त्याने हायकोर्टात धाव घेतली आहे. ‘आपल्याला अटक करु नये, तसेच आपल्या कोणत्याही संघटनांवर कारवाई करु नये,’ अशी मागणी त्याने याचिकेद्वारे केली आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाफिजची संपत्ती जप्त केलीच जाईल, असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन, पाकिस्तान दहशतवाद विरोधातील लढाईत कोणतीही साथ देत नसल्याचा आरोप केला होता. तसेच, पाकिस्तान एक नंबरचा खोटारडा आणि विश्वासघातकी देश असल्याचं म्हटलं  होतं. ट्रम्प यांच्या ट्विटला उत्तर देताना अब्बासी यांनी, “आम्ही हाफिजच्या संपत्ती जप्त करण्यासाठी तयार आहोत. पण अमेरिकेने आम्हाला कमजोर बनवण्याचे प्रयत्न करु नयेत.” असं म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget