एक्स्प्लोर
पाकिस्तानी तरुणीचे गायत्री मंत्राचे सूर, नवाज शरीफ यांची दाद
कराची : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासमोर गायत्री मंत्रांचं पठण करण्यात आलं. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. कराचीमध्ये होळीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे.
या कार्यक्रमात नवाज शरीफ प्रमुख पाहुणे होते. यावेळी नरोदा मालिनी नावाच्या तरुणीने गायत्री मंत्राचं पठण केलं. गायत्री मंत्र संपल्यानंतर शरीफ यांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं. यानतंर शरीफ यांनी हॅप्पी होली म्हणत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली.
नवाज शरीफ म्हणाले की, 'पंतप्रधान म्हणून सर्व धर्माच्या लोकांची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. अल्लाह कोणत्याही शासकाला विचारणार नाही की त्याने कोणत्या एका ठराविक धर्माच्या लोकांसाठी काय केलं? तो माझ्यासारख्या लोकांना विचारेल की, त्याचं हे जग आम्ही कसं सुंदर केलं? एक धर्म दुसऱ्या धर्मापेक्षा वरचढ ठरेल यासाठी पाकिस्तानची निर्मिती झालेली नाही. धर्म कोणावरही जबरदस्ती करत नाही. इस्लाममध्ये जबरदस्तीने केलेलं धर्मांतर हा अपराध आहे.'
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement