मतांसाठी कायपण! केस गळतीवर मोफत उपचाराचे आश्वासन
Hair Transplant Issue : मत मिळवण्यासाठी लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला जातो. काही घोषणा या मतदाराच्या एका वर्गासाठी महत्त्वाची असते तर दुसऱ्यांसाठी हास्यास्पद असते.
Hair Transplant Issue in Election : निवडणुका आल्यानंतर राजकीय पक्ष, उमेदवारांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. लोकांच्या जीवनाशी निगडीत मुद्यावर भाष्य केले जाते. त्याशिवाय लोकप्रिय घोषणा करण्यावर अनेकांचा भर असतो. निवडणुकीत मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांकडून कोणती घोषणा केली जाईल, याचा नेम नाही. सध्या दक्षिण कोरियात याचा प्रत्यय येत असून केस गळतीचा मुद्दा प्रमुख झाला आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ली जे-म्युंग यांनी केस गळतीच्या उपचारासाठी सरकार मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ली जे-म्युंग यांनी या आठवड्यात केस गळतीच्या मोफत उपचाराची घोषणा केली होती. त्यानंतर हा मुद्या आता चर्चेत आला आहे. मागील निवडणुकीत उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम, अमेरिकेसोबतचे संबंध, आर्थिक घोटाळे, आर्थिक समस्या आदी मुद्दे चर्चेत होते.
टक्कल असणाऱ्या अनेक मंडळींनी ली जे-म्युंग यांच्या या घोषणेचे स्वागत केले आहे. तर, मते मिळवण्यासाठी कोणत्याही लोकप्रिय घोषणा करण्यात येत असल्याची टीका विरोधकांनी केली. सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले. अनेकांनी म्युंग यांच्या घोषणेचे स्वागत करताना म्हटले की, टक्कल असणाऱ्या, केस गळतीने त्रस्त झालेल्या लोकांच्या भावना कोणीतही समजून घेतल्या आहेत. दक्षिण कोरियात पहिल्यांदा टक्कल असणाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण असल्याचे युजर्सने म्हटले.
जे म्युंग यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, हेअर ट्रान्सप्लांटचा खर्च हा राष्ट्रीय आरोग्य विम्यातून केला पाहिजे. म्यूंग यांनी सोशल मीडियावर केस गळतीच्या उपचारासाठी, हेअर ट्रान्सप्लांटसाठी एक चांगले धोरण बनवणार असल्याची घोषणा केली.
दक्षिण कोरियात सरासरी प्रत्येक पाच पैकी एका व्यक्तीला केस गळतीची समस्या आहे. हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा खर्च सरकारकडून विमा कार्यक्रमात समाविष्ट केला नाही. काही गंभीर आजारामुळे केस गळती होत असल्यास त्याच्या उपचारासाठी काही मदत देण्यात येते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- वाढदिवसाच्या पार्टीत सहभाग महागात; बडे मंत्री अन् अधिकाऱ्यांना सरकारचा झटका! हे आपल्याकडं कधी होणार?
- ओमायक्रॉनची लाट म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड; शास्त्रज्ञांचा दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha