एक्स्प्लोर

70 वर्ष जुन्या बलात्काराच्या खटल्यात चौघं निर्दोष

यूएसमधील फ्लोरिडामध्ये 1949 साली 17 वर्षीय गौरवर्णीय तरुणीने चौघा कृष्णवर्णीयांवर बलात्काराचा आरोप केला होता. मात्र सत्तर वर्ष जुन्या खटल्यात 'ग्रोव्हलँड फोर'ना न्यायालयाने निर्दोष ठरवलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बलात्काराचा शिक्का लागलेले चारही आरोपी आज हयात नाहीत.

वॉशिंग्टन : तुमची बाजू सत्याची असेल, तर न्यायाचं पारडं तुमच्या बाजूने कधी ना कधी झुकतंच, असं म्हटलं जातं. 'बलात्कारी' असा शिक्का माथी घेऊन आयुष्य व्यतित केलेल्या चौघांच्या पदरात न्यायाचं दान पडण्यासाठी एक-दोन नव्हे, तर तब्बल 70 वर्ष लागली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील चार कृष्णवर्णीयांना अशावेळी न्याय मिळाला, जेव्हा त्यांच्यापैकी एकही जण हयात नाही. 87 वर्षीय तक्रारदार तरुणीने 'मी खोटं बोलले' अशी कबुली दिली. यूएसमधील फ्लोरिडामध्ये 1949 साली 17 वर्षीय गौरवर्णीय तरुणीने चौघा कृष्णवर्णीयांवर बलात्काराचा आरोप केला होता. कार नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्यात मदत मागताना चौघांनी आपल्यावर अत्याचार केले, असा बनाव तक्रारदार तरुणीने रचला होता. चार्ल्स ग्रीनली, वॉल्टर अर्विन, सॅम्युअल शेफर्ड आणि अर्नेस्ट थॉमस हे चौघे या कथित बलात्कार प्रकरणात आरोपी होते. 'ग्रोवलँड फोर' या नावाने ते ओळखले जात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बलात्काराचा शिक्का लागलेले चारही आरोपी आज हयात नाहीत. अमेरिकेत शुक्रवारी झालेल्या सुनावणीला त्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. यावेळी, सत्तर वर्ष जुन्या खटल्यात त्यांना निर्दोष ठरवण्यात आलं. म्हणजेच अल्पवयीन तरुणीने केलेला बलात्काराचा आरोप खोटा असल्याचं सिद्ध झालं. 'योग्य गोष्ट करण्यासाठी कधीच उशीर होत नाही' अशा शब्दात गव्हर्नर रॉन डिसँटिस यांनी या निकालाचं महत्त्व अधोरेखित केलं. प्रत्यक्षात हे चौघे आरोपी नसून पीडित होते, असं म्हणत डिसँटिस यांनी त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. 1949 साली तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर जमावाने 400 गोळ्या झाडून थॉमसची हत्या केली होती. हिंसक जमावाने चौघांची घरंही पेटवली होती. शेफर्डला पुनर्चाचणीला नेणाऱ्या शेरीफने (पदाधिकारी) गोळी घालून त्याची हत्या केली. ग्रीनली आणि अर्विन यांना आजन्म कारावास सुनावण्यात आला होता. 1968 मध्ये पॅरोलवर बाहेर आलेल्या अर्विनचा मृतदेह सापडला होता. तर 2012 मध्ये ग्रीनलीची हत्या करण्यात आली. कथित बलात्काराचा आरोप करणाऱ्या नॉर्मा पॅजेट 87 वर्षांच्या आहेत. सुनावणीला हजेरी लावलेल्या नॉर्मा यांनी 'मी खोटं बोलले' अशी कबुली दिली. कुठल्याच पुराव्याशिवाय चौघांवर खटला चालवण्यात आल्याचं आता तपासात पुढे आलं. कथित आरोपींना शिक्षा सुनावणारे खंडपीठातील सर्व न्यायाधीश गौरवर्णीय होते. बलात्कार झाला नसावा, या वैद्यकीय अहवालाकडे कानाडोळा करत निकाल देण्यात आला होता. ग्रोव्हलँड फोर केसवर आधारित 'डेव्हिल इन द ग्रूव्ह' या पुस्तकाला 2013 साली पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget