एक्स्प्लोर
इंग्रजी साहित्यिक खजुओ इशिगुरुओ यांना साहित्याचा नोबेल
‘द रिमेन्स ऑफ द डे’ या प्रसिद्ध कादंबरीचे ते लेखक आहेत.
स्वीडन : प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक खजुओ इशिगुरुओ यांना यंदाचा साहित्याचा नोबेल जाहीर झाला आहे. ‘द रिमेन्स ऑफ द डे’ या प्रसिद्ध कादंबरीचे ते लेखक आहेत.
आठवणी, काळ या गोष्टींवर आधारित त्यांचं बहुतांश लेखन आहे. त्यांनी एकूण 8 पुस्तकं लिहिली. शिवाय, सिनेमा आणि टेलिव्हिजनसाठी पटकथा लेखनही केलं.
‘द रिमेन्स ऑफ द डे’ ही कादंबरी वाचकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. सर्वाधिक वाचली गेलेली ही त्यांची कादंबरी 1989 प्रसिद्ध झाली.
इशिगुरुओ यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1954 रोजी जपानमधील नागासाकीत झाला. 1960 साली त्यांचं संपूर्ण कुटुंब ब्रिटनला स्थलांतरित झालं. त्यांना 1982 रोजी ब्रिटीश नागरिकत्व मिळालं.
1974 साली त्यांनी यूनिव्हर्सिटी ऑफ केंटमध्ये उच्च शिक्षणास सुरुवात केली. इंग्रजी आणि तत्त्वज्ञान 1978 साली ते बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) पदवी मिळवली. त्यानंतर यूनिव्हर्सिटी ऑफ इस्ट अँग्लियामधून सृजनशील लेखनात त्यांनी एमए पूर्ण केलं.
खजुओ इशिगुरुओ यांच्या कादंबऱ्या :
- अ पेले व्ह्यू ऑफ हिल्स (1982)
- अॅन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड (1986)
- द रिमेन्स ऑफ द डे (1989)
- द अनकन्सोल्ड (1995)
- व्हेन वी वेअर ऑर्फन्स (2000)
- नेव्हर लेट मी गो (2005)
- द ब्युरिड जायंट (2015)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement