Elon Musk Viral Tweet: एलॉन मस्क आता फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड विकत घेणार? नेटकरी संभ्रमात, ट्विटची चर्चा
Elon Musk Viral Tweet: एलॉन मस्क आता फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड विकत घेणार का? ट्विटची चर्चा होत असून आता नेटकरी यावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
Elon Musk Viral Tweet: अनेकदा आपल्या ट्विट्समुळे चर्चेत राहणारे एलॉन मस्क (Elon Musk) यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने ट्विटरवर लिहिले की, ते इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड (Manchester United) विकत घेत आहे. त्यांच्या या ट्विटनंतर इंटरनेटवर जणू भूकंपच झाला. ट्विटरवर, टेस्लाचे मालक खरोखरच फुटबॉल क्लब विकत घेणार? याबद्दल चर्चा सुरू झाली.
मस्कच्या या ट्विटवर यूजर्सचे अनेक प्रश्न
एलॉन मस्क यांनी आज सकाळी एक ट्विट केले. त्यांनी लिहिले, हे अगदी स्पष्ट आहे की मी रिपब्लिकन पक्षाला आणि डेमोक्रॅटिक पक्षाला समान पाठिंबा देतो. या ट्विटनंतर त्यांनी आणखी एक पोस्ट केले, ज्यामध्ये लिहिले की, मी मँचेस्टर युनायटेड खरेदी करत आहे, मस्कच्या या ट्विटवर यूजर्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Also, I’m buying Manchester United ur welcome
— Elon Musk (@elonmusk) August 17, 2022
डीलबाबत किती गंभीर?
एलॉन मस्क अनेकदा असे ट्विट करतात, जे चर्चेचा विषय बनतात. त्यामुळे त्यांनी ट्विटरवर मँचेस्टर युनायटेडला विकत घेण्याची घोषणा केली आहे, परंतु या वेळी युजर्सच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
नुकताच ट्विटरसोबतचा करार तुटला
एलॉन मस्क यांनी अलीकडेच सोशल मीडिया साइट ट्विटरशी देखील करार तोडला आहे. याआधी त्यांनी ट्विटरसोबत मोठी डील केली होती. मात्र, नंतर ते या करारातून बाहेर पडले. याबाबत ट्विटरने मस्कविरोधात खटलाही दाखल करण्यात आला आहे. ट्विटरने म्हटले की, अब्जाधीश मस्क करारातून बाहेर पडण्यासाठी स्पॅम खाती वापरत आहेत.
मस्क नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणू शकतात
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क ट्विटरवर सुरू असलेल्या कायदेशीर लढाई दरम्यान काहीतरी मोठे करण्याची तयारी करत आहेत. रिपोर्टनुसार, एलॉन मस्क लवकरच त्यांचे नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X.com लाँच करू शकतात. याआधी मस्कने ट्विटरला 44 बिलियन डॉलर्समध्ये विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता, त्यानंतर त्यांनी डीलमधून माघार घेतली. ट्विटरसोबतच्या डीलच्या वादामुळे एलोन मस्क नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X.com लाँच करण्याचा विचार करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या व्यासपीठाच्या नावाची घोषणा खुद्द मस्क यांनी केली आहे. 10 ऑगस्ट रोजी, एका चाहत्याने मस्कला विचारले की जर ट्विटर डील झाली नाही तर तो स्वतःचे सोशल प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार करू शकतो. प्रत्युत्तरात मस्क म्हणाले, - X.com. मात्र, त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली नाही.