(Source: Poll of Polls)
Elon Musk on EVM : निवडणुकीसाठी ईव्हीएम वापर रद्द करा! मनुष्य किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका; एलॉन मस्क यांची थेट मागणी
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन रद्द करण्यात याव्यात. मनुष्य किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका आहे, जरी हा धोका कमी आहे, तरीही खूप जास्त आहे, असे एलाॅन मस्क यांनी म्हटले आहे.
Elon Musk on EVM : जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी (Elon Musk on EVM) इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) म्हणजेच ईव्हीएमने निवडणुका न घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सोशल मीडिया साइट X वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन रद्द करण्यात याव्यात. मनुष्य किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका आहे, जरी हा धोका कमी आहे, तरीही खूप जास्त आहे.
We should eliminate electronic voting machines. The risk of being hacked by humans or AI, while small, is still too high. https://t.co/PHzJsoXpLh
— Elon Musk (@elonmusk) June 15, 2024
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराची ईव्हीएमबाबत पोस्ट
मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना हे सांगितले. केनेडी ज्युनियर यांनी पोर्तो रिकोच्या निवडणुकीत ईव्हीएमशी संबंधित अनियमिततेबद्दल एका पोस्टद्वारे सांगितले होते.
केनेडी म्हणाले की, पोर्तो रिकोच्या निवडणुकीत शेकडो मतदानात अनियमितता दिसून आली. चांगली गोष्ट म्हणजे पेपर ट्रेल असल्याने ही कमतरता ओळखण्यात आली आणि मतांची संख्या दुरुस्त करण्यात आली. या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत.
अनेक कंपन्यांकडून एआय प्लॅटफॉर्म लॉन्च
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI ने आपल्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रभाव टाकला आहे. औषधे, चित्रे किंवा व्हिडिओ बनवणे, कार असेंबल करणे अशा अनेक कामांसाठी AI चा वापर केला जात आहे. गुगल आणि मायक्रोसॉफ्टसह अनेक कंपन्यांनी त्यांचे एआय प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहेत.
सरकार AI बाबत डिजिटल इंडिया विधेयक आणू शकते
दुसरीकडे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे तयार केलेल्या डीपफेक व्हिडिओ आणि सामग्रीवर बंदी घालण्यासाठी मोदी सरकार डिजिटल इंडिया विधेयक आणणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या विधेयकात AI तंत्रज्ञानाचा अधिक चांगला वापर आणि पद्धतींवर चर्चा केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विधेयकासाठी सरकार विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या