एक्स्प्लोर

Elon Musk ठरले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती; संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

Elon Musk World Richest Man : मस्क यांनी Amazon.com Incचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागे टाकत जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थान मिळवलं आहे. या यादीत बेजोस 2017 पासून पहिल्या स्थानावर होते.

Tesla Inc. आणि Space X चे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) यांच्यासाठी 2021 या नव्या वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थानं धमाकेदार झाली आहे. कारणही तसंच आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये Elon Musk यांना सर्वात वरचं, अर्थात अग्रस्थान मिळालं आहे. इलेक्र्टीक कार निर्मात्यांच्या शेअरची किंमत गुरुवारी 4.8 टक्क्यांनी तेजीत पाहायला मिळाली. ज्यामुळं मस्क यांनी Amazon.com Inc चे संस्थापक जेफ बेजोस यांना पछाडत ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्समध्ये अग्रस्थानी पोहोचले आहेत. जगातील 500 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

मूळच्या दक्षिण आफ्रिकेच्या असणाऱ्या या इंजिनिअरचं नेट वर्थ न्यूयॉर्कमध्ये सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास 188.5 बिलियन डॉलर इतकी होती. हा आकडा बेजोस यांच्या तुलनेत $ 1.5 बिलियननं जास्त आहे. बेजोस या यादीत 2017 पासून अग्रस्थानी होते. पण, आता मात्र त्यांची क्रमवारी घसरली आहे.

स्पेस एक्सपलोरेशन टेक्नोलॉजी कॉरपोरेशन किंवा स्पेस एक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर असणारे मस्क हे प्रायव्हेट स्पेस क्षेत्रात बेजोस यांचे प्रतिस्पर्धी आहेत. बेजोस यांच्याकडे ब्लू ऑरिजिन LLC ची मालकी आहे.

कोरोना व्हायरसवरील प्रतिबंधात्मक लसीच्या ड्राय रन संबंधीची महत्त्वाची माहिती एका क्लिकवर... 

मागील 12 महिन्यांचा आढावा घेतल्यास हा काळ मस्क यांच्यासाठी खास ठरला. मागील वर्षी त्यांच्या वार्षिक मिळकतीत तब्बल 150 अब्ज डॉलर्सनं वाढ झाली. आतापर्यंत ही सर्वाधित वेगानं झालेली वाढ ठरत आहे. मिळकतीत झपाट्यानं वाढ होण्यामागे टेस्लाच्या शेअरमध्ये आलेली अनपेक्षित तेजी हे मुख्य कारण आहे. मागील यामध्ये 743 टक्क्यांनी वाढ झाली. दरम्यान, 2020 मधील नोव्हेंबर महिन्यातच मस्क यांनी बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर

व्हिडीओ

Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Amruta Fadnavis and Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
Embed widget