(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Xiaomi Technology : चीनच्या शाओमी टेक्नॉलॉजी कंपनीला ईडीकडून कारणे दाखवा नोटीस, 5551 कोटींची मालमत्ता जप्त
ईडीने शाओमी टेक्नॉलॉजी (Xiaomi Technology) या चीनच्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
Xiaomi Technology : ईडीच्या (ED) निर्णायक प्राधिकरणाने शाओमी टेक्नॉलॉजी (Xiaomi Technology) या चीनच्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. शाओमी कंपनीचे अधिकारी आणि तीन मोठ्या बँकांनाही ईडीकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. शाओमी कंपनीवर ईडीने फेमा अंतर्गत कारवाई करत याआधी तब्बल 5 हजार 551 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त मालमत्तेची कारवाई ईडीच्या निर्णायक प्राधिकरणाने योग्य असल्याचं म्हटलं आहे.
फेमाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक मनुकुमार जैन आणि कंपनीचे विद्यमान संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी समीर बी राव यांच्यासह कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. फेमाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने सीटी बँक, एचएसबीसी बँक आणि ड्यूश बॅंक एजीला देखील कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. सीआयटीआय बँक, एचएसबीसी बँक आणि डच बँक एजीला फेमाच्या कलम 10 (4) आणि 10 (5) चं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. परदेशात कंपनीकडून रॉयल्टीच्या रुपाने पैसे पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि तसेच तडतोड केल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: