एक्स्प्लोर
सीरियात रक्तरंजित होळी, आत्तापर्यंत 700 जणांची हत्या
सीरियातील घौटाच्या पूर्वी भागातील हल्ले थांबण्याचं नाव घेत नाही आहे. राजधानी जवळच वसलेल्या या भागात सातत्याने हवाई हल्ले सुरु असल्याने, शहराचं रुपांतर भयाण खंडहरमध्ये झालं आहे. शहरात आत्तापर्यंत 700 पेक्षा जास्त निष्पापांची बळी गेला आहे.
दमास्कस : सीरियातील घौटाच्या पूर्वी भागातील हल्ले थांबण्याचं नाव घेत नाही आहे. या भागातील नागरिकांचा जीवन-मरणाशी संघर्ष सुरु आहे. राजधानी जवळच वसलेल्या या भागात सातत्याने हवाई हल्ले सुरु असल्याने, शहराचं रुपांतर भयाण खंडहरमध्ये झालं आहे. शहरात आत्तापर्यंत 700 पेक्षा जास्त निष्पापांची बळी गेला आहे.
सीरियात गेल्या आठ वर्षांपासून सुरु असलेल्या गृहयुद्धाने आता टोक गाठलं आहे. देशाचे राष्ट्रप्रमुख बशर-अल-असद यांना यापूर्वी अनेक शहरं बंडखोर आणि ISIS च्या दहशतवाद्यांच्या तावडीतील मुक्त करण्यात यश मिळालं. पण दुसरीकडे घौटा शहर अजूनही बंडखोरांच्या ताब्यात आहे.
घौटा शहर बंडखोरांचा बालेकिल्ला बनल्याने, तो नेस्तनाबुद करण्यासाठी राष्ट्रप्रमुख बशर-अल-असद यांच्यासह रशियानेही कंबर कसली आहे.
आत्तापर्यंत काय-काय झालं?
- 2013 पासून घौटा शहर सीरिया प्रशासन आणि बंडखोर यांच्यातील धुमश्चक्रीत भरडलं जात आहे. सध्या या शहराची स्थिती दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या शहरांपेक्षाही अतिशय वाईट झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
- सध्या इथल्या नागरिकांना खायला पूरेसं अन्न देखील मिळत नाही आहे. रुग्णालयं यापूर्वीच उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरात भूकबळीचं प्रमाण वाढलं आहे.
- 2017 मध्ये रशिया आणि इराण यांनी या शहरातील हिंसेचारापासून चार हात लांब राहण्याचं मान्य केलं होतं. तसेच या भागासाठी रशिया आणि सीरियाची लढाऊ विमानं उड्डाण घेणार नसल्याचही स्पष्ट करण्यात आलं होतं.
- पण गेल्या 19 फेब्रुवारी रोजी सीरियाच्या लढाऊ विमानांनी रशियन धावपट्ट्यांवरुन हवेत झेप घेत बॉम्ब हल्ले सुरु केले. त्यामुळे काही क्षणात संपूर्ण शहर बेचिराख झालं. शहरात जागोजागी मृतदेहांचे खच पडले होते.
- या हल्ल्यावर एमनेस्टी इंटरनॅशनलने खेद व्यक्त केला. तसेच या घटनेची वॉर क्राईम म्हणजेच युद्धकाळातील गुन्ह्यांच्या यादीत नोंद केली जाईल, असंही सांगितलं. या बॉम्बहल्ल्यात सहा रुग्णालयं आणि शहरातील अनेक मेडिकल सेंटर उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे.
- गेल्या शनिवारी म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्रात एका प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं. या प्रस्तावात घौटा शहरासाठी 30 दिवसांच्या शस्त्रसंधीचा उल्लेख होता. रशियासह अनेक देशांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं.
- पण गेल्या रविवारी सिरियाच्या लष्कराने घौटामध्ये पुन्हा आपली मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत हवाई हल्ले सुरु करण्यात आले.
- अल-जजिराच्या वृत्तानुसार, गेल्या 26 फेब्रुवारी रोजी सीरियाच्या लष्कराला आत्तापर्यंत एक इंचाचाही भू-भाग जिंकता आला नाही. पण तरीही या हल्ल्यासाठी लष्कराने आत्तापर्यंत मोर्टार बँरल बॉम्ब, क्लस्टर बॉम्ब आणि बंकर उद्ध्वस्त करणऱ्या बॉम्बचा वापर करण्यात आला.
- आता तर गृहयुद्धाच्या काळात वेळोवेळी करण्यात आलेल्या हल्ल्यात क्लोरिन गॅसचाही वापर केल्याचे समोर येत आहे. सीरिया सिव्हिल डिफेन्स बचाव दलाने (ज्यांना व्हाईट हेल्मेटच्या नावानेही ओळखलं जातं) सांगितलं की, “या हल्ल्यात मारले गेलेल्या नागरिकांची स्थिती पाहिली, तर त्यांच्यावर क्लोरिन गॅसचा वापर केला गेला होता.”
- तर दुसरीकडे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी क्लोरिन गॅसच्या वापराचं वृत्त फेटाळून लावलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement