Earth Like Planets : अंतराळात सापडली दुसरी 'पृथ्वी', शास्त्रज्ञांना मोठं यश; पृथ्वीपासून किती अंतरावर आहे 'हा' ग्रह?
Planet Nine : जपानमधील वैज्ञानिकांनी पृथ्वीसारख्या दुसऱ्या ग्रहाचा शोध लावला आहे. एक अभ्यासानुसार, आपल्या सूर्यमालेत पृथ्वीसारखा आणखी एक ग्रह (Kuiper Belt Planet) असल्याचा दावा करण्यात आला आहे.
![Earth Like Planets : अंतराळात सापडली दुसरी 'पृथ्वी', शास्त्रज्ञांना मोठं यश; पृथ्वीपासून किती अंतरावर आहे 'हा' ग्रह? earth like planet in kuiper belt solar system japan astronomers research Earth Like Planets : अंतराळात सापडली दुसरी 'पृथ्वी', शास्त्रज्ञांना मोठं यश; पृथ्वीपासून किती अंतरावर आहे 'हा' ग्रह?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/20/60213a866fc9c71ffd15dc3b517262fd1689845097223600_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अंतराळात (Space) अजूनही अनेक रहस्य लपलेली आहेत. जगभरातील अंतराळ संशोधन संस्था या रहस्यांवरील पडदा हटवण्यासाठी दिवसरात्र संशोधन करत आहेत. ब्रम्हांडामध्ये पृथ्वीसारखे ग्रह शोधण्यासाठीही जगभरातील शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरु आहे. आता शास्त्रज्ञांना अंतराळात दुसरी पृथ्वी शोधली आहे. जपानच्या शास्त्रज्ञांनी अंतराळात पृथ्वीसारखा दुसरा ग्रह शोधल्याचा दावा केला आहे. जपानच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाच्या अहवालानुसार, हा ग्रह आपल्याच सूर्यमालेत असून तो पृथ्वीप्रमाणे आहे.
अंतराळात सापडला 'पृथ्वी'सारखा दुसरा ग्रह
जपानच्या वैज्ञानिकांच्या मते, आपल्या सूर्यमालेत आठ नाही तर, नऊ ग्रह आहेत. हा नववा ग्रह पृथ्वीप्रमाणे आहे. प्लूटोचा ग्रहाचा दर्जा हटवल्यानंतर आपल्या सूर्यमालेतील ग्रहांची संख्या आठ झाली होती. सूर्यमालेतील सर्वात लहान आकाराच्या प्लूटोचा ग्रहाचा दर्जा काढून त्याला बटूग्रह हा दर्जा देण्यात आला. त्यानंतर आता जपानच्या शास्त्रज्ञांनी नवव्या ग्रहाचा शोध लावला आहे. जपानच्या शास्त्रज्ञांच्या या दाव्यानंतर आता खरोखरच दुसरी पृथ्वी सापडली आहे का आणि त्या ग्रहावरही पृथ्वीप्रमाणे राहता येईल का अशा चर्चांना उधाण आलं आहे.
क्विपर बेल्टमध्ये आहे नववा ग्रह
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जपानी खगोलशास्त्रज्ञांच्या नवीन रिपोर्टनुसार, नववा ग्रह आपल्या सूर्यमालेतच आहे. हा ग्रह क्विपर बेल्टमध्ये लपलेला आहे. सूर्यमालेतील शेवटचा ग्रह नेपच्यून ओलांडला की तिथून क्विपर बेल्ट सुरू होतो. हा पट्टा गोल आकाराचा आहे, जो संपूर्ण सूर्यमालेला घेरतो. क्विपर बेल्टमध्ये लाखो लघुग्रह आहेत, जे बर्फाने झाकलेले आहेत. सूर्यमालेच्या निर्मितीदरम्यान उरलेले तुकडे क्विपर बेल्टमध्ये आहेत.
पृथ्वीपासून किती दूर आहे नववा ग्रह?
जपानी शास्त्रज्ञांनी नवीन ग्रहाचे नाव 'क्विपर बेल्ट प्लॅनेट' (KBP) असं ठेवलं आहे. क्विपर बेल्ट हा ग्रह पृथ्वीपासून 4.5 अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. तज्ज्ञांच्या मते, 'क्विपर बेल्ट प्लॅनेट' (KBP) पृथ्वीपेक्षा तीनपट मोठा आहे. पण येथील तापमान इतके कमी आहे. जपानमधील ओसाका येथील किंदाई विद्यापीठातील पॅट्रिक सोफिया लिकावाका आणि टोकियोच्या राष्ट्रीय खगोलशास्त्रीय वेधशाळेने हा अभ्यास केला आहे.
क्विपर बेल्ट ग्रहावर मानवी वस्ती शक्य आहे?
क्विपर बेल्ट ग्रह आकारने पृथ्वीपेक्षा मोठा असला तरी, या ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी टिकवणं अशक्य आहे. पृथ्वी ही सौरमालेमध्ये जीवसृष्टी राहण्यायोग्य क्षेत्रात येते, म्हणजेच जिथे जीवन सहजतेने फुलू शकते. पण, नव्याने आढळलेल्या ग्रहावर जीवसृष्टी निर्माण करणे कठीण असल्याचं म्हटलं जात आहे.
शास्त्रज्ञांनी नेमकं काय सांगितलं?
टोकियोच्या राष्ट्रीय खगोलशास्त्रीय वेधशाळेच्या या नवीन संशोधनाचा अहवाल 'द ॲस्ट्रॉनॉमिकल जर्नल'मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. यामध्ये शास्त्रज्ञांच्या अहवालनुसार त्यांनी सांगितलं आहे की, आम्हाला पृथ्वीसारख्या ग्रहाच्या अस्तित्वाची शक्यता दिसत आहे. क्विपर बेल्टमध्ये ग्रह असण्याची शक्यता आहे. सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळापासून असे ग्रह अस्तित्वात आहेत.
संबंधित इतर बातम्या :
NASA : शास्त्रज्ञांनी शोधली दुसरी 'पृथ्वी', आकारही समान; इथेही मानवाचं वास्तव्य?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)