एक्स्प्लोर
प्रिन्स विल्यम आणि केट यांच्या तिसऱ्या बाळाचा जन्म
35 व्या वर्षी केट मिडलटन आणि प्रिन्स विल्यम तिसऱ्यांदा पालक झाले.
लंडन : केंब्रिजचे ड्यूक आणि डचेस अर्थात प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांच्या तिसऱ्या बाळाचा जन्म झाला आहे. केटने सोमवारी लंडनमधील सेंट मेरी रुग्णालयात मुलाला जन्म दिला.
35 व्या वर्षी केट मिडलटन आणि प्रिन्स विल्यम तिसऱ्यांदा पालक झाले. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजून एका मिनिटाने (भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.31 वाजता) बाळाचा जन्म झाला.
बाळाचं वजन 8 पाऊंड असून दोघांची प्रकृती उत्तम आहे. बाळाच्या जन्मानंतर अवघ्या सात तासातच डचेस ऑफ केंब्रिज बाळाला कडेवर घेऊन रुग्णालयाबाहेर आली.
ब्रिटनच्या राजघराण्यातील नवा पाहुणा क्वीन एलिझाबेथ यांचा सहावा पणतू आहे. 4 वर्षांचा प्रिन्स जॉर्ज आणि 2 वर्षांची प्रिन्सेस चार्लोट यांना खेळण्यासाठी भाऊ मिळाला आहे.
बाळाचं नाव ऑर्थर ठेवण्यात येईल, अशी अटकळ बांधली जात आहे. जेम्स, चार्ल्स, अल्बर्ट ही नावंही चर्चेत आहेत.
प्रिन्स विल्यम यांचा धाकटा भाऊ हॅरी पुढच्या महिन्यात अभिनेत्री मेघन मॉर्कलसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement