एक्स्प्लोर

अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा फिस्कटली, आता ट्रम्प पुढे काय करणार? होर्मुझ संदर्भात मोठी घोषणा

इस्लामाबादमधील शांतता करार अयशस्वी झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेतूंबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत एका मोठ्या कृती योजनेची घोषणा केली आहे.

Donald Trump On Iran :  इस्लामाबादमधील शांतता करार अयशस्वी झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेतूंबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत एका मोठ्या कृती योजनेची घोषणा केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचे वचन दिले होते, परंतु ते हेतुपुरस्सर तसे करण्यात अयशस्वी ठरले आहेत. ज्यामुळं जगभरातील अनेक लोकांना आणि देशांना चिंता, अशांतता आणि त्रास सहन करावा लागल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ते पाण्यात सुरुंग पेरल्याचा दावा करतात, पण त्यांचे संपूर्ण नौदल आणि त्यांची बहुतेक सुरुंग पेरणारी जहाजे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यांनी तसे केले असेलही, पण कोणता जहाजमालक असा धोका पत्करु इच्छितो? असा सवाल ट्रम्प यांनी केलाय. 

इराणच्या प्रतिष्ठेला गंभीर धक्का 

इराणच्या प्रतिष्ठेला मोठे आणि कायमस्वरूपी नुकसान झाले आहे. त्यांच्या उर्वरित नेत्यांचीही प्रतिमा डागाळली आहे. पण आम्ही या सगळ्याच्या पुढे गेलो आहोत. त्यांनी वचन दिल्याप्रमाणे, त्यांनी हा आंतरराष्ट्रीय जलमार्ग लवकरात लवकर खुला करण्याची प्रक्रिया सुरु करावी असे ट्रम्प यांनी म्हटलं आहे. 

इराणकडून प्रत्येक कायद्याचे उल्लंघन

ट्रम्प म्हणाले, ते प्रत्येक कायद्याचे उल्लंघन करत आहेत. पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सक्षम आणि अत्यंत पात्र नेतृत्वाखाली इस्लामाबादमध्ये झालेल्या बैठकीबद्दल मला उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांनी माहिती दिली आहे. ट्रम्प म्हणाले, ते असामान्य लोक आहेत. भारतासोबतच्या युद्धात 30 ते 50 दशलक्ष लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल ते सतत माझे आभार मानतात. हे ऐकून मला नेहमीच आनंद होतो. 

Strait of Hormuz: होर्मुजच्या सामुद्रधुनीवर कोणाचे वर्चस्व?

चर्चेतील दुसरा मोठा वादाचा मुद्दा म्हणजे 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz). जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या समुद्री मार्गाच्या सुरक्षेचे पूर्ण नियंत्रण आपल्या हातात राहावे, अशी अट अमेरिकेने घातली होती. या अटींवर इराणने तीव्र आक्षेप घेतल्याने कोणतीही तडजोड होऊ शकली नाही.

इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील 40 दिवसांच्या युद्धावर 15 दिवसांचा सीजफायर लागू झाला मात्र, चर्चेत तोडगा न निघाल्याने हा युद्धविराम जास्त काळ टिकणार नाही, अशी भीती जागतिक राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पाकिस्तान अद्यापही मध्यस्थाची भूमिका बजावण्यास तयार असला तरी, अमेरिका आणि इराणमधील अविश्वासाची दरी रुंदावल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
Embed widget