एक्स्प्लोर

Donald Trump: 'पोरं इथं जन्माला घालून नागरिकत्व मिळताच भारतासारख्या नरकातून इथं अख्खं कुटूंब घेऊन येतात आणि...' ट्रम्प यांची भारत आणि भारतीयांवर तळपायातील आग मस्तकात जाणारी वर्णभेदी टीका

Donald Trump: ट्रम्प 'बर्थराईट सिटीझनशिप'च्या विरोधात असून, भारत आणि चीनमधून होणाऱ्या स्थलांतरामुळे अमेरिकेचे नुकसान होत असल्याचे चित्र उभे करण्यासाठी थेट नरकाशी तुलना केली आहे. 

Donald Trump on India: बाळ जन्माला येते आणि लगेच अमेरिकन नागरिक होते, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला भारतासारख्या नरकातून (Hellhole) अमेरिकेत घेऊन येतात, अशा शब्दात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात आणि भारतीयांवर गरळ ओकली आहे. ट्रम्प 'बर्थराईट सिटीझनशिप'च्या विरोधात असून, भारत आणि चीनमधून होणाऱ्या स्थलांतरामुळे अमेरिकेचे नुकसान होत असल्याचे चित्र उभे करण्यासाठी थेट नरकाशी तुलना केली आहे. 

अमेरिकेबद्दल कोणतीही निष्ठा नाही

कॅलिफोर्नियातील हाय-टेक नोकऱ्यांमध्ये भारत आणि चीनच्या लोकांमुळे अमेरिकन नागरिकांना (विशेषतः गोऱ्या लोकांना) संधी मिळत नसल्याचेही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.  भारत आणि चीनमधील स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येमुळे अमेरिका ही भारताची किंवा चीनची एक 'वसाहत' बनेल आणि अमेरिकेची राष्ट्रीय ओळख नष्ट होईल, असेही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.  नवीन येणाऱ्या स्थलांतरित समुदायाला (ज्यात भारताचा समावेश केला आहे) अमेरिकेबद्दल कोणतीही निष्ठा (Loyalty) नाही, असा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

केवळ नागरिकत्व मिळवण्यासाठीच 

ट्रम्प यांनी जन्मजात नागरिकत्वाच्या कायद्यावर टीका करणारा मायकल सॅव्हेज (Michael Savage) यांचा व्हिडिओ शेअर करून या कायद्याच्या दुरुस्तीची गरज अधोरेखित केली आहे. स्थलांतरित लोक केवळ नागरिकत्व मिळवण्यासाठी गरोदरपणाच्या नऊ महिन्यांत अमेरिकेत येतात आणि या कायद्याचा आधार घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करतात, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन (ACLU) ही संस्था अमेरिकेला 'सेसपूल' (Cesspool) बनवण्याचा प्रयत्न करत असून ती या वादग्रस्त कायद्याचे समर्थन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संविधानाची मर्यादा

डोनाल्ड ट्रम्प आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, संविधानाचा हा भाग अशा काळात लिहिला गेला होता जेव्हा विमाने, दूरदर्शन किंवा इंटरनेट अस्तित्वात नव्हते, त्यामुळे सध्याच्या काळात तो कालबाह्य झाला आहे. जन्मजात नागरिकत्वाचा निर्णय केवळ वकिलांच्या हातात न ठेवता, अमेरिकन जनतेने मतदानाद्वारे (सार्वमत) ठरवावा, असेही त्यांनी म्हटलं आहे.  सध्याचे स्थलांतरित पूर्वीच्या युरोपियन स्थलांतरितांप्रमाणे अमेरिकन संस्कृतीत मिसळत नाहीत आणि त्यांच्यात अमेरिकेबद्दल निष्ठेचा अभाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेत आता इंग्रजी भाषा बोलली जात नाही, असा दावा करून देशाच्या भाषिक ओळखीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

वकिलांच्या वर्चस्वाला विरोध

अमेरिकन न्यायव्यवस्था आणि वकील सामान्य जनतेच्या मतांकडे दुर्लक्ष करून केवळ तांत्रिक बाबींवर चर्चा करत असल्याचा आरोप यात केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील जन्मजात नागरिकत्वावरील चर्चा केवळ कायद्याच्या तांत्रिकतेत अडकली असून ती जनमताचे प्रतिबिंब नाही, असे मत सॅव्हेज यांनी व्यक्त केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget