एक्स्प्लोर
लिओ वराडकर यांच्याशी बोलताना पत्रकाराच्या हास्यावर ट्रम्प घायाळ
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आयर्लंडचे नवे पंतप्रधान लिओ वराडकर यांच्यातील फोनवरील संभाषणादरम्यान एक मजेशीर प्रसंग घडला, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
आयर्लंडचे नवनिर्वाचित पंतप्रधान लिओ वराडकर यांच्याशी डोनाल्ड ट्रम्प फोनवरुन संवाद साधत होते. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आयरिश पत्रकार डोनाल्ड ट्रम्पच्या ओव्हल ऑफिसमध्ये जमले होते. पण ट्रम्प यांनी आपलं संभाषण मध्येच थांबवलं. कारण जमलेल्या पत्रकारांपैकी एका महिला पत्रकार कॅट्रियोना पेरीचं हास्य त्यांना खूपच आवडलं.
त्या महिला पत्रकाराला बोलावून डोनाल्ड ट्रम्प लिओ वराडकर यांना म्हणाले की, "आपलं संभाषण ऐकण्यासाठी आयर्लंडची समस्त मीडिया इथे जमली आहे. माझ्यासोबत सुंदर हास्य असलेली महिला आहे. मी पैज लावतो तिची तुमच्याशी वागणूक चांगलीच असेल," अशी कोपरखळी त्यांनी आपल्या संभाषणात मारली. त्यांनंतर तिथे एकच हशा पिकला.
पाहा व्हिडीओ
https://twitter.com/CaitrionaPerry/status/879804904696496128
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement