Donald Trump : सात नवीन आणि सुंदर विमाने पाडली, भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा
Donald Trump Claim On Ind Pak Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध थांबवण्यासाठी आपण टॅरिफच्या हत्याराचा वापर केला. त्यामुळेच दोन्ही देशांनी माघार घेतल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये मध्यस्ती करून ते थांबवल्याचा (India-Pakistan Ceasefire) दावा केला. टॅरिफला हत्यार बनवलं आणि दोन अणवस्त्र संपन्न देशातील युद्ध थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये सात नवीन आणि सुंदर फायटर जेट पडले अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पण ही सात विमाने कोणत्या देशांची होती यावर मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केलं नाही.
भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा संघर्ष (India-Pak Conflict) थांबवले आणि दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकू नये म्हणून हस्तक्षेप केल्यादा दावा या आधीही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. आता जपानच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पुन्हा एकदा तोच दावा केला आहे. टॅरिफ (Tariff Policy) या आर्थिक धोरणाचा वापर करून दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये सीजफायर (Ceasefire) घडवून आणल्याचं ट्रम्प म्हणाले.
India-Pakistan Ceasefire : माझ्यामुळे युद्ध थांबले
जपान दौर्यावर असताना ट्रम्प यांनी अमेरिकन सैनिकांना संबोधित करताना म्हटलं, “आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मी अनेक युद्धं टाळली आहेत. व्यापार आणि टॅरिफ धोरणांमुळे मी जगाची मोठी सेवा केली आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तान संघर्षाच्या उंबरठ्यावर होते, तेव्हा माझ्या भूमिकेमुळेच ती परिस्थिती आटोक्यात आली.”
Donald Trump Claim On Ind Pak Ceasefire : मोदी आणि पाकिस्तानी लष्करप्रमुखाशी चर्चा
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी त्या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि पाकिस्तानच्या लष्करी प्रमुखांना (Pakistan Army Chief) स्पष्टपणे सांगितले होते की, 'जर तुम्ही युद्ध कराल, तर आम्ही तुमच्याशी कोणताही व्यापार करणार नाही.'
ट्रम्प यांनी दावा केला की त्या काळात दोन्ही देश युद्धासाठी सज्ज होते. त्यामध्ये सात नवे आणि सुंदर जेट (Seven New and Beautiful Jets) पाडले गेले होते. पण आपल्या इशाऱ्यानंतरच परिस्थिती नियंत्रणात आली असा दावा ट्रम्प यांनी केला.
Trump Claims Nobel Peace Prize : नोबेल शांतता पुरस्काराची मागणी
ट्रम्प यांनी म्हटलं की, “मी जगातील आठ मोठे संघर्ष थांबवले आहेत आणि भारत-पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी माझं योगदान अमूल्य आहे. त्यामुळे मला नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize) मिळायला हवं.”
India Rejects Trump’s Claim : भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) ट्रम्प यांच्या दाव्याला पूर्णपणे खोटं ठरवलं आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलं की भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याचे निर्णय दोन्ही देशांमधील थेट राजनैतिक संपर्कांद्वारे (Direct Diplomatic Channels) झाले आणि कोणत्याही तिसऱ्या देशाची भूमिका नव्हती.
ही बातमी वाचा:
























