डिजिटल पेमेंटमधील महाबलाढ्य कंपन्या एकत्रित; अमेरिकेच्या 'स्केअर'कडे 'आफ्टरपे'चा ताबा, 29 अब्ज डॉलर्सचा व्यवहार
Jack Dorsey : बँकाच्या क्रेडीट कार्डला पर्याय देण्याची योजना 'स्केअर' कडून आखण्यात आली असून हा व्यवहार त्याचाच एक भाग असल्याचं सांगण्यात येतंय.
न्यूयॉर्क : डिजिटल पेमेंट क्षेत्रातल्या दोन जगप्रसिद्ध महाबलाढ्य कंपन्या एकत्र येत आहेत. अमेरिकन पेमेंट अॅप असलेली 'स्क्वेअर' आता ऑस्ट्रेलियन 'आफ्टरपे' या जगप्रसिद्ध कंपनीचा ताबा घेणार आहे. तब्बल 29 अब्ज डॉलर इतक्या मोठ्या किंमतीला हा व्यवहार झाला असून 'स्क्वेअर'चा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जॅक डॉर्सीने याची घोषणा केली आहे.
'स्केअर' आणि 'आफ्टरपे'चे ध्येय समान असून या पुढील वाटचाल एकत्रित असल्याचं जॅक डॉर्सीने स्पष्ट केलं. बँकाच्या क्रेडीट कार्डला पर्याय देण्याची योजना 'स्केअर' कडून आखण्यात आली असून हा व्यवहार त्याचाच एक भाग असल्याचं सांगण्यात येतंय.
#UPDATES US digital payment platform Square, founded by Twitter boss Jack Dorsey, announces it will acquire Australia's Afterpay Limited for $29 billion https://t.co/3rCa0HZLTu
— AFP News Agency (@AFP) August 2, 2021
📸Jack Dorsey pic.twitter.com/sXMosRzkMR
ऑस्ट्रेलियन कंपनी असलेल्या 'आफ्टरपे' कडून ग्राहकांना 'बाय नाऊ, पे लॅटर' ही सुविधा देण्यात येते. त्यामुळे ग्राहक, लहान उद्योग त्यांना हव्या असलेल्या गोष्टी खरेदी करु शकतात. नंतर इन्स्टॉलमेंटमध्ये त्याची किंमत चुकवता येते. ही सेवा आता आफ्टरपेच्या अॅपवरही सुरु होणार असून त्यामुळे अमेरिकेतल्या लाखो ग्राहकांना आणि लहान उद्योगांना हव्या असलेल्या वस्तू खरेदी करता येतील. महत्वाचं म्हणजे खरेदी केलेल्या वस्तुंच्या इन्स्टॉलमेंटवर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.
स्क्वेअरच्या आणि आफ्टरपेच्या या व्यवहारामुळे आता आफ्टरपे अॅपला आपल्या व्यवसाय ऑस्ट्रेलियातही सुरु करता येणार आहे. अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलिया या देशात स्क्वेअरचे ग्राहक सर्वाधिक आहेत.
स्केअर पेमेंट अॅपचे सध्या सात कोटीहून जास्त ग्राहक आहेत. कोरोना काळात ग्राहकांकडून कॅश-फ्री खरेदीसाठी स्क्वेअर पेमेंट अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. या कंपनीकडून आता लहान उद्योगांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलियन कंपनी असलेल्या आफ्टरपेचे जगभरात 1.60 कोटी ग्राहक असून जवळपास एक लाख लहान उद्योगही यामध्ये सामिल आहेत.
आफ्टरपे आणि स्क्वेअरमध्ये झालेल्या या व्यवहारानुसार आफ्टरपेचे संस्थापक अॅन्थोनी आयसेन आणि निक मोलनार हे दोघेही आता स्क्वेअरमध्ये सामिल होतील. तसेच स्क्वेअरच्या संचालक मंडळामध्ये आफ्टरपेच्या एका संचालकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :