Darwin Day 2022 : मानवाच्या उत्क्रांती सिद्धांताचे जनक चार्ल्स डार्विन, जाणून घ्या त्यांच्याविषयी...
Darwin Day 2022 : चार्ल्स डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात. त्यांनी मानवाच्या उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांना साध्या सरळ प्रयोगांच्या माध्यमाने जगापुढे आणले.
Darwin Day 2022 : डार्विन आणि उत्क्रांतिवाद हे जणू एक समीकरणच मानले जाते. उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल होय. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. चार्ल्स रॉबर्ट डार्विन (Charles Robert Darwin) यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 साली इंग्लंड येथील शोर्पशायर शहरातील श्रेब्स्बुरी या गावी झाला. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
उत्क्रांतिवादाचे जनक चार्ल्स डार्विन :
चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे एक ब्रिटिश पदार्थशास्त्रज्ञ आणि भूवैज्ञानिक होते. विज्ञानाच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान आहे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे एक ब्रिटिश पदार्थशास्त्रज्ञ आणि भूवैज्ञानिक होते. डार्विन हे प्रामुख्याने विज्ञानाच्या विकासात त्यांच्या योगदानासाठी जाणले जातात. त्यांनी मानवाच्या उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांना साध्या सरळ प्रयोगांच्या माध्यमाने जगापुढे आणले.
डार्विनच्या निरीक्षणांमुळे उत्क्रांती आणि नैसर्गिक निवडीवर त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे. जेव्हा डार्विनने "प्रजातींच्या उत्पत्तीवर" प्रकाशित केले तेव्हा आपले जग कायमचे बदलले होते. डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या शोधाची व्याख्या चार तत्त्वांनी केली जाते. म्हणजेच,
प्रत्येक प्रजातीमध्ये भिन्नता असते. या फरकांमध्ये रंग, वजन, उंची आणि इतर वैशिष्ट्ये यांचा समावेश आहे.
उत्क्रांती सिद्धांताचे महत्त्वाचे मुद्दे :
1. एखाद्या विशिष्ट प्रजातीच्या अनेक प्रजातींच्या वनस्पती पूर्वी सारख्याच होत्या, परंतु जगातील विविध ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांची रचना बदलली त्यामुळे त्या एका प्रजातीच्या अनेक प्रजाती झाल्या.
2. वनस्पतींसारख्या प्राण्यांच्या बाबतीतही असेच आहे, मानवाचे पूर्वज एकेकाळी माकडे होते, पण काही माकडे वेगळ्या पद्धतीने जगू लागली. हळूहळू गरजांनुसार त्यांचा विकास होत गेला. तो माणूस झाला.
अशा रीतीने, वातावरण आणि परिस्थितीनुसार जीवांमध्ये हळूहळू बदल होणे किंवा अनुकूल कार्य करणे आणि परिणामी जीवांच्या नवीन प्रजातींची उत्पत्ती होणे याला उत्क्रांती म्हणतात.
चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांची डिसेंट ऑफ मॅन आणि ओरिजीन ऑफ स्पेशीज ही पुस्तके प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध झाली. 'ऑन द ओरिजीन ऑफ स्पीसीज' या पुस्तकातून त्यांनी उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला.
महत्वाच्या बातम्या :
Important Days in February 2022 : फेब्रुवारी महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha