एक्स्प्लोर

कोविड इम्पॅक्ट: अभ्यास सांगतोय याचा मानवी मेंदूच्या आकलन क्षमतेवर परिणाम

कोरोनाच्या आजारपणातून बऱ्या झालेल्या रुग्णांना मेंदूच्या कार्यक्षमतेसंबंधीत काही गोष्टींना सामोरे जावे लागते, कदाचित अशा रुग्णांमध्ये मेंदू दहा वर्षांनी म्हातारा होतोय असा इशारा नुकताच एका संशोधनातून देण्यात आला आहे.

लंडन: इंपेरियल कॉलेज ऑफ लंडनच्या अॅडम हॅम्पशायर यांच्या नेतृत्वाखाली एका अभ्यास गटाने 84 हजार कोरोना रुग्णांवर संशोधन केले आहे. यात असंही दिसून आलंय की कोरोनाच्या काही गंभीर प्रकरणात काही महिन्यांच्या काळापर्यंत रुग्णांच्या आकलनशक्तीवर परिणाम होतो. अशा रुग्णांच्या आकलनशक्तीचे मोठे नुकसान झाल्याचं दिसून आलंय.

संशोधकांनी त्यांच्या अहवालात असे म्हंटले आहे की जे रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत, ज्यांच्यात आता कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत त्यांच्या आकलनशक्तीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.

पझलवरील असलेले डॉटस् जोडणे किंवा शब्द लक्षात ठेवणे यांसारख्या आकलन विषयक चाचण्यामुळे मेंदूचे कार्य कसे चालते हे लक्षात येते. अशा प्रकारच्या चाचण्यांचा वापर अल्झायमर या आजाराचे निदान करण्यासाठी केला जातो. तसेच मेंदूच्या आकलनावरचे तात्पुरते झालेले परिणाम शोधण्यासाठी डॉक्टर याचा वापर करतात.

अॅडम हॅम्पशायर यांच्या नेतृत्वाखालील एका अभ्यास गटाने 84,285 लोकांचा अभ्यास केला. या लोकांनी ग्रेट ब्रिटिश इंटेलिजन्स टेस्टचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. हा अहवाल MedRxiv या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. परंतु अहवालाचा अजून इतर तज्ञांनी अभ्यास केलेला नाही.खासकरुन जे लोक कोरोनाच्या संक्रमणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते त्यांच्या आकलनशक्तीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. 20 ते 70 वयोगटातील लोकांच्यात हे जास्त दिसून आले आहे. काही केसेस् मध्ये तर मेंदू तब्बल दहा वर्षाने म्हातारा झाला आहे असे दिसून आल्याचे एका संशोधकाने सांगितले.

या संशोधनात भाग घेतला नसलेल्या काही शास्त्रज्ञांनी या संशोधनावर सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ज्या लोकांचा यात अभ्यास करण्यात आला आहे त्यांच्या मेंदूचा पूर्वअभ्यास किंवा पूर्व माहिती यात नव्हती. तसेच यात दीर्घकालासाठी मेंदूच्या आकलनाची स्थिती कायम राहते असाही उल्लेख नाही. त्यामुळे कोरोना काळात मेंदूच्या आकलनावर जे काही परिणाम झाले असतील ते कमी कालावधीसाठी असतील असे मत एडिनबर्ग विद्यापीठाचे प्राध्य़ापक जोएना वार्डलॉ यांनी मांडले आहे.

लंडन कॉलेज विद्यापीठाचे मेडिकल इमॅजिंग सायन्सचे प्राध्यापक डेरेक हिल यांनी या संशोधनावर त्यांच मत व्यक्त केले. ते म्हणतात, "या संशोधनामधून बाहेर आलेली माहिती ही जास्त भरवशाची नाही. कारण यात संबंधीतांच्या मेंदूचा कोरोनाचा 'संसर्ग होण्याआधी' आणि 'कोरोना झाल्यानंतर' असा अभ्यास केला नाही. तसेच यात सामील झालेल्या बऱ्याच लोकांना ते स्वत; कोरोनाग्रस्त असल्याचं वाटत होते, त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली नव्हती. हा अभ्यास वैचित्र्यपूर्ण तसेच कोणताही निष्कर्ष काढणारा नाही."

कोरोनाचा मानवी मेंदूच्या आकलनावर नेमका काय परिणाम होतोय हे समजून घ्यायचे असेल तर हा अभ्यास अधिक व्यापक करुन कोरोनाच्या संसर्गानंतर काही आठवडे आणि महिन्यांच्या कालावधीत सातत्याने करावा लागेल. त्यावेळीच समजेल की मेंदूच्या आकलन क्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम झाला आहे का नाही असेही प्राध्य़ापक हिल म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded Accident News: पहाटे चार वाजता टेम्पो दरीत कोसळला, तिघांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला
पहाटे चार वाजता टेम्पो दरीत कोसळला, तिघांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Pimpri-Chinchwad YCM Hospital: मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Salman Khan Share Photos With Salim Khan: 'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Embed widget