Coronavirus | जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जगभरात कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 34 हजार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांची संख्या 5165 ने वाढली आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत जवळपास 74 लाख 46 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 18 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 37 लाख रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 60 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 44 लाख एवढी आहे.
जगभरात कोणत्या देशात काय परिस्थिती?
कोरोनाचा सर्वाधिक कहर अमेरिकेत पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये 20 लाख लोक आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. एक लाखाहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, सध्या ब्राझील कोरोनाचं नवं केंद्र असल्याचं दिसून येत आहे. ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त रुग्णांची आणि मृत्यूंची नोंद केली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये ब्राझीलमध्ये 33,100 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 1300 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत मागील 24 तासांमध्ये 20,852 नवे रुग्ण आढळून आले असून 982 रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.
पाहा व्हिडीओ : ज्ञानदा कदमचा कोरोनाशी लढा! काय सांगतेय ज्ञानदा? कोरोनाशी लढताना...
अमेरिका : एकूण रुग्ण 2,066,401, एकूण मृत्यू 115,130
ब्राझील : एकूण रुग्ण 775,184, एकूण मृत्यू 39,797
रूस : एकूण रुग्ण 493,657, एकूण मृत्यू 6,358
यूके : एकूण रुग्ण 290,143, एकूण मृत्यू 41,128
स्पेन : एकूण रुग्ण 289,360, एकूण मृत्यू 27,136
भारत : एकूण रुग्ण 287,155, एकूण मृत्यू 8,107
इटली : एकूण रुग्ण 235,763, एकूण मृत्यू 34,114
पेरू : एकूण रुग्ण 208,823, एकूण मृत्यू 5,903
जर्मनी : एकूण रुग्ण 186,866, एकूण मृत्यू 8,844
इराण : एकूण रुग्ण 177,938, एकूण मृत्यू 8,506
8 देशांमध्ये दोन लाखांहून अधिक रुग्ण
ब्राझील, रूस, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरू या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त सात देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित आहेत. चार देस (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे फक्त 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.15 लाखांच्या पार पोहोचला आहे. चीन टॉप-17 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पोहोचला आहे. तर भारताचा टॉप-6 देशांमध्ये समावेश झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
'संकटाच्या काळात आशावादी राहा'; गूगल सीईओ सुंदर पिचई यांचा विद्यार्थांना कानमंत्र
न्यूझीलंड देश कोरोनामुक्त, पंतप्रधान जसिंडा अर्डेन यांची घोषणा
चिनी वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग, बहिष्काराची मोहीम अपयशी ठरेल; चीनने भारताला खिजवलं
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ट्विटरवर का ट्रेण्ड होतोय?
'लांसेट'ने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनबाबत अभ्यास मागे घेतला, 200 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं!