वेलिंग्टन : न्यूझीलंड देश कोरोनामुक्त झाल्याचं पंतप्रधान जसिंडा अर्डेन यांनी जाहीर केलं आहे. 50 लाख लोकसंख्येच्या या देशात आता कोरोना असलेला एकही रुग्ण नाही. 28 फेब्रुवारीला न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता, त्यानंतर पहिल्यांदाच न्यूझीलंड कोरोनामुक्त झालं आहे. गेल्या 17 दिवसात जवळपास 40 हजार कोरोना टेस्ट केल्या मात्र त्यातल्या एकही पॉझिटिव्ह आला नाही.
गेल्या 17 दिवसांत न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही. गेल्या 12 दिवसांपासून दवाखान्यात एकही रुग्ण नाही. 40 दिवसांपूर्वी समूह संसर्गाचा एक रुग्ण आढळला होता आणि त्या रुग्णाने स्वत:चं विलगीकरण (Self isolation) संपवूनही 22 दिवस लोटले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार न्यूझीलंडने सादर केलेला कोरोनाबाधितांचा अधिकृत आकडा 1154 आहे. त्यातल्या 22 लोकांनी आपला जीव गमावला आणि बाकीच्या सर्वांनी कोरोनावर मात केली.
न्यूझीलंडमध्ये कोरोनाची लागण झालेले आणि लागण झाल्याची शक्यता असलेले असे 1504 लोक होते. त्यातले 1482 बरे झाले आहेत आणि 22 लोकांनी जीव गमावला आहे. मात्र असं असलं तरी कोरोनाला दूरच ठेवण्यासाठी काटेकोर पालन करण गरजेचं असल्याचंही त्या म्हणाल्या. ज्यावेळी ही बातमी कळली त्यावेळी मी आनंदाने नाचले आणि मला नाचताना पाहून मुलीलाही आश्चर्य वाटलं मात्र तिला कारण सांगितल्यावर ती सुद्धा आमच्या नाचण्यात सामील झाली, असं पंतप्रधान जेसिंडा अर्डेन यांनी सांगितलं.
Coronavirus in India | देशातली कोरोनाबाधितांची संख्या अडीच लाख पार; सलग 8 दिवस 200हून अधिक बळी