एक्स्प्लोर

कोरोनाचा कहर! जगभरात जवळपास 65 लाख लोकांना संसर्ग; तर 30 लाख रुग्ण कोरोनामुक्त

जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. जवळपास 213 देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनाचं केंद्र समजलं जाणारा चीन टॉप-16 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला असून भारताचा समावेश टॉप-7 देशांमध्ये झाला आहे.

Coronavirus | कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 10 हजार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांचा आकडा 4528ने वाढला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत जवळपास 65 लाख लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 3 लाख 81 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 30 लाख लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 75 टक्के कोरोनाग्रस्त फक्त 13 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 48 लाखांवर पोहोचली आहे.

जगभरात कुठे किती रुग्ण, किती मृत्यू?

कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव अमेरिकेमध्ये दिसून येत आहे. अमेरिकेमध्ये 19 लाख लोक आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. एक लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. परंतु, सध्या अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये संसर्ग वेगाने वाढत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतातील कोरोना बाधितांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे.

अमेरिका : एकूण रुग्ण 1,881,205, एकूण मृत्यू 108,059 ब्राझील : एकूण रुग्ण 556,668, एकूण मृत्यू 31,278 रूस : एकूण रुग्ण 423,741, एकूण मृत्यू 5,037 स्पेन : एकूण रुग्ण 287,012, एकूण मृत्यू 27,127 यूके : एकूण रुग्ण 277,985, एकूण मृत्यू 39,369 इटली : एकूण रुग्ण 233,515, एकूण मृत्यू 33,530 भारत : एकूण रुग्ण 207,191, एकूण मृत्यू 5,829 फ्रान्स : एकूण रुग्ण 189,220, एकूण मृत्यू 28,940 जर्मनी : एकूण रुग्ण 184,091, एकूण मृत्यू 8,674 पेरू : एकूण रुग्ण 170,039, एकूण मृत्यू 4,634

पाहा व्हिडीओ : जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडल्याची अमेरिकेची घोषणा

13 देशांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त रुग्ण

ब्राझील, रूस, स्पेन, युके, इटली, भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त सात देश असे आहेत, जिथे एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. अमेरिकेसह या 13 देशांमध्ये एकूण 48 लाख रुग्ण आहेत. सहा देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन, ब्राझील) असे देश आहेत, जिथे 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1 लाखांच्या पार पोहोचला आहे. चीन टॉप-16 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. तर भारताचा समावेश टॉप-7 देशांमध्ये झाला आहे.

संबंधित बातम्या : 

व्हाईट हाऊसपर्यंत हिंसाचाराची झळ, डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बंकरमध्ये हलवलं!

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेसोबतचे संबंध तोडले, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकेत हिंसाचार! जवळपास 40 शहरांमध्ये संचारबंदी लागू, हजारो लोकांना अटक

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Embed widget