एक्स्प्लोर
Advertisement
Corona World Update | जगभरात कोरोना 77 लाखांहून अधिक कोरोनाबाधित, 39 लाखांहून अधिक बरे झाले
कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 77 लाखांच्या वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 39 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.कुठल्या देशात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...
मुंबई : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 77 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर या महामारीमुळं मृतकांची संख्या आता चार लाख 27 हजारांवर गेली आहे. मागील 24 तासात 1 लाख 40 हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 77 लाख 25 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 27 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 39 लाख 19 हजार रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 60 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 8 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 45 लाखांच्या घरात आहे.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 309,603 रुग्ण आहेत. तर 8,890 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 146,383 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 154,330 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 2,116,672 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 116,825 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 829,902 कोरोनाबाधित आहेत तर 41,901 लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर यूकेत 41,481 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 292,950 इतकी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,223 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 236,305 हजार इतका आहे.
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
-
- अमेरिका: कोरोनाबाधित- 2,116,672, मृत- 116,825
- ब्राझील: कोरोनाबाधित- 829,902, मृत- 41,901
- रशिया: कोरोनाबाधित- 511,423, मृत- 6,715
- भारत: कोरोनाबाधित- 309,603, मृत- 8,890
- यूके: कोरोनाबाधित- 292,950, मृत- 41,481
- स्पेन: कोरोनाबाधित- 290,289, मृत- 27,136
- इटली: कोरोनाबाधित- 236,305, मृत- 34,223
- पेरू: कोरोनाबाधित- 220,749, मृत- 6,308
- जर्मनी: कोरोनाबाधित- 187,251, मृत- 8,863
- इराण: कोरोनाबाधित- 182,525, मृत- 8,659
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement