एक्स्प्लोर
Advertisement
Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 61 लाखांच्या वर, तर 27 लाखांहून अधिक रुग्ण झाले बरे
कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 61लाखांच्या वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 27.34 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.कुठल्या देशात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...
मुंबई : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास 61 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये जवळपास दीड लाख नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 24 तासात 4,454 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 61 लाख 53 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 70 हजार 870 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 27 लाख 34 हजार रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 74 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 43 लाखांच्या घरात आहे.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात दहाव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 1 लाख 81 हजार रुग्ण आहेत. तर 5185 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 90,320अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 86,984 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 18 लाख 16 हजार 820 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 1 लाख 5 हजार लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 38 हजार 376 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 72 हजार 826 इतकी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. ब्राझीलमध्ये 499,966 कोरोनाबाधित आहेत तर 28 हजार 849 लोकांचा मृत्यू झालाय. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27125 लोकांचा मृत्यू झालाय. 2 लाख 86 हजार लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 33 हजार 340 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 32 हजार इतका आहे.
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
- अमेरिका: कोरोनाबाधित- 18 लाख 16 हजार 820, मृत्यू- 1 लाख 55 हजार
- ब्राझील: कोरोनाबाधित- 4 लाख 99 हजार 966, मृत्यू- 28 हजार 849
- रशिया: कोरोनाबाधित- 3 लाख 96 हजार, मृत्यू- 4 हजार 555
- स्पेन: कोरोनाबाधित- 2 लाख 86 हजार , मृत्यू- 27125
- यूके: कोरोनाबाधित- 2 लाख 72 हजार 826, मृत्यू- 38 हजार 376
- इटली: कोरोनाबाधित- 2 लाख 32 हजार, मृत्यू- 33 हजार 340
- फ्रांस: कोरोनाबाधित- 1 लाख 88 हजार, मृत्यू- 28 हजार 771
- जर्मनी: कोरोनाबाधित- 1 लाख 83 हजार, मृत्यू- 8600
- भारत: कोरोनाबाधित- 1 लाख 81 हजार, मृत्यू- 5185
12 देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित
अमेरिका, जर्मनी,स्पेन, फ्रांस, टर्की, इराण, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत आणि पेरु हे बारा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन, ब्राझील या सहा देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा एक लाखांच्या वर गेला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement