Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 51 लाखांच्या जवळ, 20 लाखांहून अधिक बरे झाले
कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 51 लाखांच्या जवळ गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 20 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. कुठल्या देशात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...
Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,591,953 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 94,992 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 35,704 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 248,293 इतकी आहे. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,888 लोकांचा मृत्यू झालाय. 279,524 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,330 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 227,364 इतका आहे.
जगात कोणत्या देशात किती कोरोनाबाधित- अमेरिका: कोरोनाबाधित- 1,591,953, मृत्यू- 94,992
- रशिया: कोरोनाबाधित- 308,705, मृत्यू- 2,972
- ब्राझील: कोरोनाबाधित- 293,357, मृत्यू- 18,894
- स्पेन: कोरोनाबाधित- 279,524, मृत्यू- 27,888
- यूके: कोरोनाबाधित- 248,293, मृत्यू- 35,704
- इटली: कोरोनाबाधित- 227,364, मृत्यू- 32,330
- फ्रांस: कोरोनाबाधित- 181,575, मृत्यू- 28,132
- जर्मनी: कोरोनाबाधित- 178,531, मृत्यू- 8,270
- टर्की: कोरोनाबाधित- 152,587, मृत्यू- 4,222
- इरान: कोरोनाबाधित - 126,949, मृत्यू- 7,183
अमेरिका, जर्मनी,स्पेन, फ्रांस, टर्की, इराण, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत आणि पेरु हे बारा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 94 हजारांवर गेला आहे.