एक्स्प्लोर
Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 37 लाखांच्या वर, तर एकूण अडीच लाखांहून अधिक मृत्यू
जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 37 लाखांच्या वर पोहोचला आहे.

मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 58 हजारांवर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 37 लाख 25 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात 12 लाख 42 हजार रुग्ण बरे झाले आहेत, अजून जवळपास 22 लाख 25 हजार लोकं कोरोनाबाधित आहेत. त्यातील दोन टक्के म्हणजे 49 हजार 250 हजार गंभीर आहेत.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत.
अमेरिकेने गेल्या २४ तासात २,३५० लोक गमावले, एकूण बळी ७२ हजार २७१, रुग्णांची संख्या १२ लाख ३७ हजार ६०० इतकी आहे. न्यूयॉर्क प्रांतात काल २६० बळी, तिथे एकूण मृतांचा आकडा २५,२०४ तर रुग्णांची संख्या ३ लाख ३० हजारांवर पोहोचली आहे.
त्या खालोखाल न्यूजर्सीत ८,२९२, मिशिगन मध्ये ४,१७९, मासाचुसेट्स ४,२१२, पेनसिल्वानिया ३,१९६, इलिनॉईस २,८३८, कनेक्टिकट २,६३३, कॅलिफोर्निया २,३७६, लुझियाना २,११५, फ्लोरिडा १,४७१,आणि वॉशिंग्टनमध्ये ८७० लोकांचा बळी या रोगाने घेतलाय.
स्पेनने गेल्या चोवीस तासात १८५ लोक गमावले आहेत. तिथं एकूण मृतांचा आकडा २५ हजार ६१३ वर गेला आहे. गेल्या चोवीस तासात इटलीत कोविड-१९ रोगाने २३६ माणसांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या २९ हजार ३१५ इतकी झाली आहे. काल रुग्णांची संख्या १,०७५ ने वाढली, इटलीत आता जवळपास २ लाख १३ हजार रुग्ण आहेत.
इंग्लंडने गेल्या २४ तासात ६९३ माणसं गमावली, एकूण बळींची संख्या २९ हजार ४२७ इतकी झालीय. तर फ्रान्सने काल दिवसभरात ३३० लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत २५ हजार ५३१ बळी आणि एकूण रुग्ण १ लाख ७० हजार ५५० वर पोहोचले आहेत.
रशियात काल ९५ बळी गेले तर एकूण १४५१ लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल ६३ ची भर पडली तिथं एकूण ६,३४० मृत्यू झाले आहेत तर रुग्णांची संख्या ९९ हजार ९७० झाली आहे.
कोरोनाने बेल्जियममध्ये काल ९२ मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा ८,०१६ वर पोहोचला आहे.
हॉलंडमध्ये काल ८६ बळी घेतले तिथे एकूण ५,१६८ लोक दगावले आहेत.
टर्की ३५२०, ब्राझील ७९२१, स्वित्झर्लंडने १,७९५, स्वीडनमध्ये २८५४, पोर्तुगाल १०७४, कॅनडात ४०४३, इंडोनेशिया ८७२,इस्रायल २३८ तर सौदी अरेबियात २०० बळी कोरोनामुळं गेले आहेत.
दक्षिण कोरियात काल २ मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा २५४ वर गेला आहे.
पाकिस्तानात रुग्णांची संख्या २२ हजारांच्या वर पोहोचली आहे, तिथे ५१४ लोकांचा बळी कोरोनाने घेतला आहे.
गेल्या २४ तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ८१ हजार २४८ तर बळींच्या आकड्यात ५ हजार ७८७ ची भर पडली.
जगातील अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन हे पाच देश असे आहेत जिथं कोरोनामुळे 20 हजाराहून अधिक बळी गेले आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 60 हजारांहून अधिक बळी गेले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
