एक्स्प्लोर
जगभरात कोरोनाचा कहर, कोरोनाबाधितांचा आकडा एक कोटी पार, 5 लाखांहून अधिक मृत्यू
जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा एक कोटींच्या वर गेला आहे. तर कोरोनामुळं मृत्यूंचा आकडा पाच लाखांवर गेलाय.दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 54.58 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. कुठल्या देशात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...
Coronavirus: : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे एक कोटींहून अधिक रुग्ण झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण एक कोटी 74 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 5 लाखांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 54 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 529,577 रुग्ण आहेत. तर 16,103 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 203,328 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 310,146 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. भारतात मागील 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक 19,906 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत तर 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 2,596,403 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 128,152 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 1,315,941 कोरोनाबाधित आहेत तर 57,103 लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर यूकेत 43,514 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 310,250 इतकी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,716 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 240,136 हजार इतका आहे.
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
- अमेरिका: कोरोनाबाधित- 2,596,403, मृत्यू- 128,152
- ब्राझिल: कोरोनाबाधित- 1,315,941, मृत्यू- 57,103
- रशिया: कोरोनाबाधित- 627,646, मृत्यू- 8,969
- भारत: कोरोनाबाधित- 529,577, मृत्यू- 16,103
- यूके: कोरोनाबाधित- 310,250, मृत्यू- 43,514
- स्पेन: कोरोनाबाधित- 295,549, मृत्यू- 28,341
- पेरू: कोरोनाबाधित- 275,989, मृत्यू- 9,135
- चिली: कोरोनाबाधित- 267,766, मृत्यू- 5,347
- इटली: कोरोनाबाधित- 240,136, मृत्यू- 34,716
- इराण: कोरोनाबाधित- 220,180, मृत्यू- 10,364
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अर्थ बजेटचा 2025
भारत
भारत
अर्थ बजेटचा 2025
Advertisement