कोरोना लस चाचणीत स्वयंसेवकाचा मृत्यू; ब्राझीलमध्ये ऑक्सफर्ड युनिवर्सिटी लसीच्या चाचणी दरम्यानची घटना
Coronavirus Vaccine Updates : कोरोना लसींची चाचणी संध्या संपूर्ण जगभरात सुरु आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्राझीलमध्ये कोरोना लसीच्या चाचणीदरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे.
![कोरोना लस चाचणीत स्वयंसेवकाचा मृत्यू; ब्राझीलमध्ये ऑक्सफर्ड युनिवर्सिटी लसीच्या चाचणी दरम्यानची घटना Coronavirus vaccine updates volunteer in oxford astrazeneca third phase trial dies in brazil कोरोना लस चाचणीत स्वयंसेवकाचा मृत्यू; ब्राझीलमध्ये ऑक्सफर्ड युनिवर्सिटी लसीच्या चाचणी दरम्यानची घटना](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/13155934/corona-vaccin.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus Vaccine Updates : कोरोना सारख्या जीवघेण्या व्हायरसच्या विळख्यात अख्खं जग अडकलं आहे. जगभरातील अनेक संशोधक कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच कोरोन व्हायरस वॅक्सिनच्या ट्रायलसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ब्राझीलमध्ये कोरोना लसीच्या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये ऑक्सफर्ड युनिवर्सिटी आपली कोरोना लस एस्ट्रोजेनिकाची चाचणी करत आहे. येथे या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु आहे.
मृत्यू झालेल स्वयंसेवक ब्राझीलमधीलच
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोना लसीच्या चाचणीवेळी मृत्यू झालेला स्वयंसेवकाला वॅक्सिनचा डोस देण्यात आला नव्हता. त्यामुळे लसीची चाचणी थांबवली जाणार नाही. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सफर्डमधील संशोधकांनी सांगितलं की, वॅक्सिनच्या सुरक्षेबाबत काही चिंता करण्याची गरज नाही. ज्या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. तो ब्राझीलमधीलच होता.
ब्रिटनमध्येही चाचणीवेळी एक स्वयंसेवकाला साइड इफेक्ट
कोरोना लसींची चाचणी संध्या संपूर्ण जगभरात सुरु आहे. ब्रिटनमध्येही याआधी ऑक्सफर्ड युनिवर्सिटीच्या लसीची चाचणी थांबवण्यात आली होती. चाचणी दरम्यान, एक स्वयंसेवक आजारी पडला होता. संशोधकांचं असं म्हणणं होतं की, जेव्हा मोठ्या प्रमाणावर परिक्षण केलं जातं, त्यावेळी एखाद्या व्यक्तीला साईड इफेक्ट होऊ शकतात.
संशोधक कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी त्यावर प्रभावी लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. जगभरात अनेक ठिकाणी कोरोना लसींचं परिक्षण सुरु आहे. तसेच अनेक ठिकाणी लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. ऑक्सफर्ड युनिवर्सिटीच्या लस सध्या परिक्षणांमध्ये सर्वात पुढे आहे. लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु असून यामध्ये आतापर्यंत जवळपास 30 हजार स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)