एक्स्प्लोर

न्यूझीलंडमध्ये पुन्हा कोरोनाव्हायरसचा शिरकाव; निवडणुका लांबणीवर, लॉकडाऊन वाढवला

कोरोनामुक्त झाल्यानंतर कोरोनाव्हायरसने न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. यामुळे तिथली निवडणूक लांबणीवर पडली असून लॉकडाऊनही वाढवला आहे.

ऑकलंड : कोरोनामुक्त झाल्यानंतर न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसने शिरकाव केला आहे. मागील 24 तासात न्यूझीलंडमध्ये 13 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 69 झाली आहे. ही बाब चिंताजनक यासाठी आहे की, जून महिन्यात न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. तसंच 100 दिवसात एकही रुग्ण आढळला नव्हता. पण आता पुन्हा एकदा कोरोनाने देशात शिरकाव केला आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढल्याने सर्वसाधारण निवडणुका चार आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. आरोग्यविषयक महासंचालक अॅशले ब्लूमफील्ड यांच्या माहितीनुसार, "सर्व नवे कोरोनाबाधित हे ऑकलंडमधील एक क्लस्टरशी संबंधित आहेत. यामधील एक मुलगा या महिन्याच्या सुरुवातील अफगाणिस्ताहून न्यूझीलंडमध्ये होता. सुरुवातीला तो कोरोना निगेटिव्ह होता. पण 14 दिवसांच्या क्वॉरन्टाईन पीरियडच्या बाराव्या दिवशी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. तेव्हापासून तो ऑकलंडमध्ये क्वॉरन्टाईन आहे. तर इतर 12 कोरोनाबाधित कम्यूनिटीमधील होते." Coronavirus | न्यूझीलंड देश कोरोनामुक्त, पंतप्रधान जसिंडा अर्डेन यांची घोषणा न्यूझीलंडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1271 नव्या कोरोनाबाधितांसह न्यूझीलंडमधील रुग्णांची संख्या आता 1271 झाली आहे. त्यामध्ये 69 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 26 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी शुक्रवारी (14 ऑगस्ट) ऑकलंड क्षेत्रात अलर्ट 3 लॉकडाऊन आणि इतर ठिकाणी अलर्ट 2 लॉकडाऊन घोषित करुन 26 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन 12 दिवसांचा असेल. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत न्यूझीलंडमध्ये एक महिन्यात राष्ट्रीय अलर्ट 4 स्तरावरचा लॉकडाऊन केला होता. यानंतर जून महिन्यात कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई जिंकणारा तो पहिला देश बनला होता. परंतु 102 दिवसांच्या अंतरानंतर मागील आठवड्याच्या सुरुवातीपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget