जगभरात कोरोना लसीकरणाचा वेग वाढला; अमेरिका-ब्राझीलसारख्या देशांच्या तुलनेत भारताचं स्थान काय?
अमेरिकेनंतर भारत हा दुसरा देश आहे ज्याने लसीकरणाचा 21 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. परंतु जर आपण लोकसंख्येच्या आधारे विचार केला तर आपण बर्याच देशांच्या मागे असल्याचं आकडेवारी सांगते. टक्केवारीनुसार पाहिलं तर भारतात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पुन्हा सुरु झाल्याने कोरोना लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. अमेरिकेनंतर भारत हा दुसरा देश आहे ज्याने लसीकरणाचा 21 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. परंतु जर आपण लोकसंख्येच्या आधारे विचार केला तर आपण बर्याच देशांच्या मागे असल्याचं आकडेवारी सांगते. टक्केवारीनुसार पाहिलं तर भारतात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. तथापि, आपल्या देशात लसीकरणाचा वेग जूनपासून वाढण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, जाणून घ्या जगातील सर्व देशांमध्ये लसीकरणाचा वेग कसा आहे.
- अमेरिकेत आतापर्यंत 29 कोटी 7 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यातील एकूण 49 टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर 40 टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
- ब्रिटनमध्ये 6 कोटी 26 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. 35 टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत, तर 57 टक्के लोकांना पहिला डोस दिला आहे.
- जर्मनीमध्ये 4 कोटी 83 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहेत. त्यातील एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के नागरिकांना प्रथम डोस देण्यात आला आहे. तर 16 टक्के नागरिकांना दोन्ही दिले गेले आहेत.
- फ्रान्समध्ये 32 कोटी नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यातील 35 टक्के लोकांना प्रथम डोस देण्यात आला आहे. तर 15 टक्के लोकांना दोन्ही दिले गेले आहेत.
- इटलीमध्ये 3 कोटी 29 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यातील एकूण 36 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 19 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहे.
- ब्राझीलमध्ये आतापर्यंत 6 कोटी 52 लाख नागरिकांना लस देण्यात येणार आहेत. एकूण 20 टक्के लोकांना प्रथम डोस देण्यात आला आहे. तर 10 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतला आहे.
- भारताने लसीकरणाचा 21 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ तीन टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 12 टक्के लोकांनी पहिला डोस दिला आहे.
दरम्यान भारतात लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू करण्यात आली. 2 जानेवारीपासून फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाले. कोरोना लसीकरणाचा पुढील टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला, ज्यामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसोबत 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ज्यांना गंभीर स्वरुपाचे आजार आहेत, अशा लोकांचे लसीकरण सुरू झाले. त्याचवेळी, 1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील प्रत्येकासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. तर 1 मे पासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले आहे.