न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोना महामारीचं संकट दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. येत्या काही दिवसात अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 1 लाख ते 2 लाखांपर्यंत पोहचू शकते, अशी भीती नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन डिजीजचे संचालक प्रख्यात संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसात अमेरिकेतील व्हेंटिलेटर्स संपू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
इटलीमध्ये कोरोना बाधितांची संख्या 97 हजारहून अधिक आहे. स्पेनमध्येही कोरोना बाधित रुग्णांची संख्या जवळपास 80 हजारवर पोहोचली आहे. इटली आणि स्पेनच्या आरोग्य यंत्रणेला या सर्वावर नियंत्रण करणे कठीण जात आहे, अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागत आहे. वेंटिलेटर्सचा तुटवडा तिथे जाणवत आहे. त्यामुळे कुणावर उपचार करायचे आणि कुणावर नाही असे मोठे आणि त्रासदायक निर्णय त्यांना घ्यावे लागत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात चिंताजनक ही स्थिती आहे, असं डॉ. फाऊची यांनी म्हटलं.
अमेरिकेतील सध्याची स्थिती
सद्यस्थितीला अमेरिकेत सर्वाधिक कोरोना बाधीत रुग्ण आहेत. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 31 हजारांवर पोहोचला आहे. तर जवळपास 2300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्कमध्ये आहेत. जवळपास 59 हजार 500 रुग्ण एकट्या न्यूयॉर्क शहरात आहेत. तर 950 हून अधिक जणांचा याठिकाणी मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील झपाट्याने वाढणारी कोरोना बाधितांची संख्या यावरुन डॉ. फाऊची यांनी यांनी हा अंदाज लावला असावा.
इटली आणि स्पेनमधील स्थितीही भयावह आहे. इटलीली कोरोनाबाधितांचा आकडा 97 हजारच्या पार गेलाय. तर येथे मृतांचा आकडाही 10,500 पार गेलाय. स्पेनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 78 हजार पार गेली आहे. तर 5500 हून अधिक लोकांना याठिकाणी मृत्यू झाला आहे. जर्मनी, इराण, फ्रान्स, इंग्लंड याठिकाणची परिस्थितीही काहीशी अशीच आहे.
संबंधित बातम्या
- CoronaUpdate | ही आणीबाणीची स्थिती, कोरोनाविरोधातील लढाईत सर्वजण एकवटल्याचं समाधान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- Mann Ki Baat | 'मी तुम्हा सर्वांची माफी मागतो'; पंतप्रधान मोदींचा 'मन की बात'मधून जनतेशी संवाद
- Coronaupdate | राज्यात कोरोनाचा सातवा बळी, मुंबईत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू
- Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत