मुंबई : राज्यात कोरोनाने सातवा बळी घेतला आहे. एका 40 वर्षीय महिलेचा मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल शनिवारी या माहिलेला छातीत दुखू लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनानं 5 बळी घेतले आहेत. तर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून मुंबईत उपचारासाठी आलेल्यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.


मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं यासंदर्भातील माहिती देताना म्हटलं आहे की, सदर महिलेला कोरोनासदृश्य लक्षण आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर कोरोना तपासणीत महिलेला संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, आज उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 193 वर पोहोचली आहे. आज पुण्यात 5, मुंबई 4, जळगाव, सांगली,नागपुरात प्रत्येकी 1 नवा रुग्ण सापडला आहे.



अमेरिकेमध्ये चीनपेक्षा जास्त संसर्ग

अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे 1 लाख 23 हजार 750 बाधित आहेत. ज्यापैकी 2227 लोकांता मृत्यू झाला आहे. चीनमध्ये निर्माण झालेल्या या व्हायरसने आतापर्यंत 3300 लोकांचा बळी घेतला आहे. तर 81439 लोकांना संसर्ग झाला आहे. दरम्यान, चीनमध्ये आता नव्या रूग्णांची संख्या घटली असून 40 ते 50 रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दहा हजारांवर

इटलीमध्ये कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. कारण शनिवारी 889 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा दहा हजार पार पोहोचला आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या इटलीमध्ये सर्वाधिक आहे. देशामध्ये या घातक आजारामुळे एकूण 10023 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये 92472 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

स्पेनमध्ये मागील 24 तासांमध्ये 832 लोकांचा मृत्यू

स्पेनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मागील 24 तासांत 832 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर संसर्गामुळे मरणाऱ्यांची एकूण संख्या 5982 झाली आहे. स्पेनमध्ये दररोज आठ हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे नवे रूग्ण आढळून येत आहेत.

फ्रान्समध्ये 319 लोकांचा मृत्यू

फ्रान्समध्ये शनिवारी कोरोना व्हायरसमुळे 319 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशात महामारीमुळे मृत्यू झालेल्यांचा आकजा 2314 वर पोहोचला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत कोरोनाचा 37575 लोकांना संसर्ग झाला आहे. 17620 लोक हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

पाहा व्हिडीओ : मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19, मदत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं आवाहन


इराणमध्ये संसर्ग झालेल्यांचा आकडा 35408 वर

इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून आतापर्यंत 35408 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर तुर्कीमध्ये शुक्रवारपर्यंत 2517 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पाकिस्तानमध्ये 1400 पेक्षा अधिक नवीन प्रकरणं समोर आली आहेत.

पाकिस्तानमध्येही कोरोनाने हैदोस घातला आहे. येथे 12000 अधिक कोरोना संशयित आहेत. तर 1400 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पंजाब प्रांतात 490, सिंध येथे 457, खैबर पख्तूनख्वामध्ये 180, तर बलूचिस्तान येथे 133, गिलगित-बाल्टीस्तान 107, इस्लामाबाद 39 आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 1000 लोकांचा मृत्यू

ब्रिटनमध्ये मागील 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसमुळे 260 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशात कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या 1000 वर पोहोचला आहे. तर कोरोना बाधितांचा आकडा वाढला असून 17089 वर पोहोचला आहे.