मुंबई : संपूर्ण जग कोरोनापुढे हतबल झालं आहे. भारतातही कोरोना व्हायरस फोफावताना दिसत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच देशातील उद्योजक आणि इतरांना मदतीसाठी आवाहनदेखील केलं आहे. अनेकांनी कोरोनासाठीच्या उपाययोजनांसाठी मदत केली आहे. तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही मदत करण्यासाठी सरसावले आहेत. अशातच कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारने मोठं पाऊल उटललं आहे. अक्षय कुमारने पीएम केयर्स फंडसाठी 25 कोटी रूपयांची मदत केली आहे.



अक्षय कुमारने सशल मीडियावर ट्वीट करत याची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदतीचं आवाहन केलेल्या ट्वीटवर रिप्लाय करत अक्षय कुमारने ट्वीट केलं आहे. त्यामध्ये अक्षय म्हणाला की, 'ही ती वेळ आहे, ज्यामध्ये फक्त लोकांच्या जीवाची किंमत आहे. यासाठी आम्ही जे काही करू शकतो, ते करणं गरजेचं आहे. मी @narendramodi यांच्या PM-CARES फंडसाठी 25 कोटी रूपये देणार असल्याचं जाहीर करतो, जीव असेल तर सर्वकाही असेल.'



कोरोनासाठीच्या उपाययोजनांसाठी मदत करण्यासाठी अक्षयला प्रेरणा कुठून मिळाली, याबाबत अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही याबाबत माहिती दिली आहे. अक्षय कुमारच्या ट्वीटला कोट करत ट्विंकलने लिहिलं आहे की, 'मला या व्यक्तीवर गर्व आहे. जेव्हा मी त्यांना विचारलं, तुम्ही खरचं एवढी मोठी रक्कम देणार आहात? कारण आपल्यासाठीही पैशांची गरज आहे. तेव्हा ते म्हणाले की, मी जेव्हा सुरू केलं होतं, त्यावेळी माझ्याकडे काहीच नव्हतं आणि आता मी इथपर्यंत पोहोचलो आहे, की मी अशा व्यक्तींना मदत करू शकतो, ज्यांच्याकडे काहीच नाही. तर मी मागे कसा हटू शकतो'



दरम्यान, कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आता सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीही याला हातभार लावत आहेत. कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या संकटाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. तर, या काळात कोणी उपाशी राहु नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे. राज्य सरकारने देखील कोरोनाशी दोनहात करण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.


मुख्यमंत्र्यांकडून मदतीसाठी आवाहन


कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोविड-19 (COVID- 19 ) या नव्या खात्याती निर्मिती करण्यात आली आहे. या खात्यात स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


मदत करण्यासाठी खात्याची सविस्तर माहिती


मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19


खाते क्रमांक- 39239591720


स्टेट बँक ऑफ इंडिया,


मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023


शाखा कोड 00300


आयएफएससी कोड SBIN0000300


संबंधित बातम्या :


Mann Ki Baat | 'मी तुम्हा सर्वांची माफी मागतो'; पंतप्रधान मोदींचा 'मन की बात'मधून जनतेशी संवाद

Coronavirus | जगभरात 6 लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे रूग्ण; इटलीमध्ये मृतांचा आकडा 10 हजार पार


Coronavirus | कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा हैदराबाद युनिव्हर्सिटीचा दावा


IndiaFightsCorona | कोरोनाविरोधात लढ्यासाठी दानशूरांचे हात सरसावले, मदतीचा ओघ सुरु

Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार


Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार