माद्रिद : कोरोना व्हायरस समोर संपूर्ण जग हतबल झालं आहे. कोरोनाचं मृत्यूतांडव सुरूच आहे. स्पेनमध्येही कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. स्पेनमधील शाही परिवारातील राजकुमारी मारिया टेरेसा यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्या 86 वर्षांच्या होत्या. त्यांचा भाऊ प्रिंस सिक्सटो एनरिके डी बॉरबोन यांनी एका फेसबुक पोस्टमार्फत याबाबत माहिती दिली आहे. शाही परिवारातील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.


राजकुमारी मारिया यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त त्यांचा भाऊ आणि प्रिंस सिक्स्तो एनरिक दे बॉरबॉर यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मार्फत दिली आहे. त्यांनी सांगितलं की, 'त्यांच्या बहिणीचा मृत्यू कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर झाला आहे. मारियाचा अंतिम संस्कार शुक्रवारी माद्रिदमध्ये करण्यात येणार असल्याचं तिच्या भावाने फेसबुक पोस्टमार्फत सांगितलं आहे. राजकुमारी मारिया टेरेसा यांचा मृत्यू पॅरिसमध्ये झाला आहे.



दरम्यान, स्पेनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मागील 24 तासांमध्ये 844 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्पेनमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 5982 झाला आहे. स्पेनमधील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्पेनमध्ये कोरोनाने तिसरा टप्पा पार केला आहे. त्यामुळे लवकरच कोरोना बाधितांच्या संख्येत कमतरता येईल. प्रशासनाने सांगितले की, सध्या देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 73 हजारांवर पोहोचली आहे.


Mann Ki Baat | 'मी तुम्हा सर्वांची माफी मागतो'; पंतप्रधान मोदींचा 'मन की बात'मधून जनतेशी संवाद


कोरोनापुढे अवघं जग हतबल


जगभरात जीवघेणा कोरोना व्हायरस हैदोस घालत आहे. जगभरातील 170 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत जगभरात साडेसहा हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 31 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 42 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळए सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमधील मृतांचा आकडा दहा हजारांवर पोहोचला आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 92 हजार 472 आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 5 हजार 992 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संसर्ग झालेल्यांचा आकडा 73 हजार 235 वर पोहोचला आहे.


संबंधित बातम्या : 


Coronaupdate | राज्यात कोरोनाचा सातवा बळी, मुंबईत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू


Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत


Coronavirus | जगभरात 6 लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे रूग्ण; इटलीमध्ये मृतांचा आकडा 10 हजार पार

Coronavirus | कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा हैदराबाद युनिव्हर्सिटीचा दावा


IndiaFightsCorona | कोरोनाविरोधात लढ्यासाठी दानशूरांचे हात सरसावले, मदतीचा ओघ सुरु


Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार