(Source: ECI/ABP News/ABP Majha)
The Yamazaki : 'हौसेला मोल नाही'; पठ्ठ्यानं घेतली 4 कोटींची 55 वर्ष जुनी व्हिस्की
एका व्यक्तीनं इस्तंबूल विमानतळावरुन (Istanbul airport) तब्बल 55 वर्ष जुनी असणारी जपानी व्हिस्कीची बाटली खरेदी केली आहे.
The Yamazaki : अनेक लोकांकडे दारूचं कलेक्शन असते. वेगवेगळ्या ब्रँडच्या तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या दारूचं कलेक्शन करायला अनेकांना आवडतं. काही लोकांना जूनी दारू खरेदी करायला आवडतं. जूनी वाईन तसेच जूनी व्हिस्की ही एखाद्या दुकानात किंवा विमानतळावर असणाऱ्या ड्यूटी फ्री स्टोअरमध्ये विक्रीसाठी ठेवली जाते. पण कोट्यवधी रूपयांना दारू विकत घेतलेलं तुम्ही कधी ऐकलंय? चीनमधील एका व्यक्तीनं इस्तंबूल विमानतळावरुन (Istanbul airport) तब्बल 55 वर्ष जुनी असणारी जपानी व्हिस्कीची बाटली खरेदी केली आहे. या सिंगल मॉल्ट व्हिस्कीच्या बॉटलची किंमत 4 कोटी 14 लाख रुपये आहे.
इस्तंबूल विमानतळावरील ड्युटी फ्री स्टोअरमधून सिंगल मॉल्ट जपानी व्हिस्कीची ही रेअर असणारी बाटली €488,000 ला म्हणजेच 4.14 कोटी रुपयांना विकली गेली आहे. या व्हिस्कीचे नाव यामाझाकी असं आहे. लिमीडेट अॅडिशन असणारी ही व्हिस्की 55 वर्ष जूनी आहे. एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलने दिलेल्या माहितीनुसार, ही व्हिस्की डिसेंबर 2021 पासून विमानतळावरील युनिफ्री ड्युटी फ्रीच्या आउटलेट्समध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. ही व्हिस्की खरेदी करण्यासाठी आठ ईच्छूक ग्राहक आले होते. त्यांच्यामध्ये बोली लावण्यात आली. चीनमधील एका व्यक्तीने बोली जिंकली. युनिफ्री ड्युटी फ्रीचे सीईओ अली सेनहर म्हणाले, "आमच्या स्टोअरमधून या व्हिस्कीची विक्री झाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे."
हाऊस ऑफ सनटोरीच्या इतिहासातील ही सर्वात जुनी सिंगल मॉल्ट व्हिस्की आहे. ही व्हिस्की 1960 च्या दशकातील तीन सिंगल मॉल्टचे मिश्रण आहे, ज्यामध्ये सनटोरीचे संस्थापक शिंजिरो टोरी यांच्या देखरेखीखाली डिस्टिल्ड केलेले घटक आहेत.
इतर बातम्या :
- Telangana Silk Sarees : माचिसच्या पेटीत मावते 'ही' सिल्क साडी, तेलंगणाच्या विणकराची कामगिरी
- विवाहबाह्य संबंधांमुळे महिलेला 100 चाबकाचे फटके, इंडोनेशियामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha