High Speed Train : चीनमध्ये हायस्पीड मॅगलेव्ह ट्रेनचं लॉन्चिंग; स्पीड एवढा की ट्रेन हवेत तरंगताना दिसते
देशातील सर्वात वेगवान ट्रेन मॅगलेव्हने 2003 मध्ये चीनमध्ये धावण्यास सुरुवात केली. या ट्रेनची ताशी सर्वाधिक स्पीड 431 किलोमीटर आहे.
बीजिंग : चीनने मंगळवारी सुपर हाय स्पीड मॅगलेव्ह ट्रेनचं उद्घाटन केले. चिनी मीडियाच्या वृत्तानुसार, 600 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. मॅगलेव्ह ट्रेन धावताना रुळावर थोडीशी तरंगताना दिसते. मॅगलेव्ह ट्रेन चीनने स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केली आहे. किनारपट्टीवरील शहर किंगदाओ येथे ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. ही ट्रेन विद्युत चुंबकीय शक्तीच्या (Electro Magnetic Force) मदतीने रुळाच्या वर तरंगताना दिसते. या ट्रेनला 'फ्लोटिंग ट्रेन' असेही म्हटले जाते.
शांघाई ते बीजिंग प्रवासासाठी अवघे अडीच तास लागणार
चीन हे तंत्रज्ञान गेल्या दोन दशकांपासून वाहतुकीच्या क्षेत्रात मर्यादित स्तरावर वापरत आहे. शांघाईमध्ये मॅगलेव्ह ट्रेनसाठी छोटी लाईन आहे, जी शहरातून मुख्य विमानतळावर जाते. मात्र चीनकडे अद्याप आंतरराज्य किंवा आंतरराज्यीय मॅगलेव्ह लाईन तयार केलेली नाही. शांघाई आणि चेंग्दू यासारख्या चीनच्या काही शहरांमध्ये या मार्गासाठी संशोधन सुरु आहे. या ट्रेनचा वेग ताशी 600 किलोमीटर आहे. त्यानुसार शांघाई ते बीजिंगपर्यंत जाण्यास अडीच तास लागतील. शांघाई ते बीजिंगचे अंतर 1000 किलोमीटरहून अधिक आहे, त्यानुसार त्याचा अंदाज काढता येतो. जर एखाद्या विमानाने कुठेतरी जाण्यासाठी 3 तास लागतील तर, त्याच अंतरासाठी एक वेगवान ट्रेन साडेपाच तास घेईल.
2003 पासून चीनमध्ये हाय स्पीड ट्रेन
देशातील सर्वात वेगवान ट्रेन मॅगलेव्हने 2003 मध्ये चीनमध्ये धावण्यास सुरुवात केली. या ट्रेनची ताशी सर्वाधिक स्पीड 431 किलोमीटर आहे. ही ट्रेन शांघाई पुडोन्ग विमानतळास शांघाईच्या पूर्वेकडील लाँगयाग रोडशी जोडले आहे. जपान आणि जर्मनीसारखे देशही येथे मॅगलेव्ह ट्रेन चालवण्याचा विचार करत आहेत. मात्र या ट्रेनचे नेटवर्क तयार करण्यासाठी खूप खर्च आहे, म्हणून बर्याच देशांनी ही कल्पना सोडली आहे.