एक्स्प्लोर

China-Bhutan Relation : भारताची भूतानशी वाढती जवळीक 'ड्रॅगन'ला खटकली, चीनची भूतानला धमकी

China-Bhutan News : भूतान आणि चीन यांच्यामध्ये आधी चांगले संबंध होते, मात्र 1949 मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केल्याने भूतानसोबतचे चीनचे संबंध बिघडले.

China-Bhutan Relation : 'ड्रॅगन'ची आता नवीन चाल पाहायला मिळत आहे. भारतासोबतची भूतानची (India-Bhutan Relation) जवळीक 'ड्रॅगन'ला खटकताना दिसत आहे. त्यामुळे चीनने (China) आता भूतानला (Bhutan) धमकी दिली आहे. चीनवर नेहमीच इतर देशांना धमकावल्याने आरोप लावले जातात. रिपोर्टनुसार, आता चीनने भूतानला भारतासोबतच्या करारावरून धमकी दिल्याचं म्हटलं जात आहे. नेपाळच्या एपर्डाफास.कॉमने (Apperdafas.com) तज्ज्ञांच्या अहवालानुसार माहिती दिली आहे की, चीन आता भूतानला भारताच्या संबंधांमुळे धमकावत आहे. भारतासोबतची जवळीक कमी करण्यासाठी चीन भूतानला धमकावत असल्याचं रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. यामागचं कारण म्हणजे चीनच्या मते, भूतानच्या चीनसाठी असणाऱ्या परराष्ट्र धोरणावर भारताचं नियंत्रण आहे. त्यामुळे चीन भारत-भूतान संबंधांविरोधात असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. 

भूतान आणि चीनचं संबंध बिघडले

भूतान आणि चीन यांच्यामध्ये आधी चांगले संबंध होते, मात्र 1949 मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केल्याने भूतानसोबतचे चीनचे संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर चीनी नेता माओ त्झ-तोंग यांनी भूतानच्या क्षेत्रावर दावा केल्याने हे संबंध आणखीनच बिघडले. चीनने 1954 आणि 1958 सालच्या नवे नकाशे आणि भूतानमधील 300 वर्ग मीटर क्षेत्र अवैधरित्या ताब्यात घेतल्याने भूतान आणि चीन संबंधांमध्ये फूट पडली.

भारताची भूतानला मदत

भूतान आणि चीनमध्ये वाद सुरु असताना भारताने 1961 मध्ये भूतानच्या सुरक्षा दलांना प्रशिक्षित करण्यासाठी भूतानमध्ये लष्करी प्रशिक्षण दल (IMTRAT) तैनात करून मदत केली. तेव्हापासून भारताकडून भूतानला सुरक्षा पुरवली जात आहे. 2017 मध्ये भारत आणि चिनी सैन्यादरम्यान डोकलाममध्ये झालेल्या संघर्षामुळे सुरक्षेचा मुद्दा अधिक महत्त्वाचा झाला होता. अशा परिस्थितीत, सीमा सुरक्षित करण्यासाठी भारत आणि भूतानच्या सैन्यामध्ये अधिक चांगला समन्वय आणि भागीदारीची गरज होती.

भारताशी भूतानची चीनला खटकतेय जवळीक

भारताने भूतानला शैक्षणिक क्षेत्रात 4,500 कोटी रुपयांचे अनुदान दिलं आहे. तसेच भारत आणि भूतानमध्ये 2018 ते 2023 या कालावधीसाठी 400 कोटी रुपयांची संक्रमणकालीन व्यापार सुविधा करार देखील झाला आहे. यामुळे भारत-भूतान यांच्यातील आर्थिक संबंध अधिक मजबूत झाले आहेत. दोन्ही देशांदरम्यान इतर अनेक क्षेत्रात एकत्र काम सुरु आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात भूतानचे राजे भारत दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी चर्चा केली. दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंधांमुळे चीनला त्रास होत असल्याने चीन आता भूतानला लक्ष्य करू शकतो, असं रिपोर्टनुसार समोर येत आहे.

दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध आहेत

भूतान आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध फायदेशीर आहेत. जलविद्युत, व्यापार, शिक्षण आणि सामाजिक-आर्थिक विकास यासह विविध क्षेत्रात भारताने भूतानला महत्त्वाची मदत दिली आहे. भूतानच्या निर्यातीसाठीही भारत ही मोठी बाजारपेठ आहे. भारत-भूतान संबंध जलविद्युत निर्मितीशी संबंधित आहेत. भारत आणि भूतान यांच्यामध्ये भूतानमध्ये 10,000 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी करार झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget