एक्स्प्लोर
लग्नासाठी भाडोत्री वऱ्हाडी, नवरदेवाची थेट तुरुंगात रवानगी!
बीजिंग: लग्न म्हटलं की, गाणं, बजावणं आणि त्याच्या ठेक्यावर नाचणारं वऱ्हाड आपसूकच आलं. पण चीनमध्ये एका व्यक्तीला चक्क वऱ्हाडामुळे जेलची हवा खावी लागली आहे. आपल्या लग्नासाठी या व्यक्तीनं थेट भाडोत्री वऱ्हाडी नेले होते. त्यामुळे नवरदेवालाच बेड्या ठोकण्यात आल्या.
नवऱ्या मुलाचे वऱ्हाडी आणि मित्र हे भाडोत्री आहेत असं जेव्हा नवरीकडील नातेवाईकांना कळलं त्यावेळी त्यांनी पोलिसांना पाचारण करुन नवऱ्या मुलाला थेट तुरुंगात धाडलं. स्थानिक मीडियानुसार, लग्नसोहळा सुरु झाल्यानंतरही मुलाचे आई-वडील तिथं पोहचले नाही आणि त्याचवेळी नवरीकडील लोकांना त्याचा संशय आला. त्यानंतर नवरीकडील नातेवाईकांनी वऱ्हाडी लोकांशी बोलणं सुरु केलं. तेव्हा देखील त्यांना मुलाविषयी फारशी माहिती देता आली नाही. तेव्हा हे भाडोत्री वऱ्हाडी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
एका स्थानिक टीव्ही चॅनलशी बोलताना नवऱ्याकडील पाहुण्यानं सांगितलं की, 'नवऱ्या मुलाने प्रत्येकी बारा डॉलर देऊन आपल्याला या लग्नाला आणलं होतं. यामध्ये टॅक्सी ड्रायव्हर, विद्यार्थी आणि इतर लोकंही सहभागी होते.' एका व्यक्तीनं स्पष्ट केलं की, 'नवऱ्या मुलाने या लग्नात येण्यासाठी सोशल साईटवर संपर्क साधला होता.'
नवरा मुलगा आणि नवरी मुलगी हे मागील तीन वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. पण दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असल्यानं नवऱ्या मुलीला नवऱ्या मुलाच्या मित्रांविषयी फारशी माहिती नव्हती.
दरम्यान, नवऱ्या मुलानं असं का केलं? याविषयी नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. पण काही मीडिया रिपोर्टनुसार, नवरा मुलगा हा गरीब कुटुंबातील होता. यामुळेच त्यांच्या लग्नाला नवरीकडील कुटुंबाचा विरोध होता. यामुळे भर लग्नात आपल्या कुटुंबाची अब्रू जाऊ नये यासाठी नवऱ्या मुलानं भाडोत्री वऱ्हाड्यांना बोलवलं. असं सांगितलं जातं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement