एक्स्प्लोर

जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

धुळे :  नजरचुकीनं एलओसी पार गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन न करण्याचा निर्धार, कुटुंबियांनी केला आहे. एलओसी पार करुन चंदू पाकिस्तानात गेल्याची बातमी समजताच त्यांच्या आजीचा धक्क्यानं मृत्यू झाला. आज आजीचा दशक्रिया विधी असून, चंदू परतल्याशिवाय आजीच्या अस्थी विसर्जन न करण्याचा निर्धार, चंदूचे मोठे भाऊ आणि कुटुंबियांनी केला आहे. नजरचुकीने एलओसी पार 27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 7 तळांना उद्ध्वस्त झाली. यामध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. या रात्रीतच चंदू चव्हाण हे नजरचुकीने पाकिस्तानात पोहोचल्याचं उघड झालं. खुद्द पाकिस्तान संरक्षण मंत्रालयानेच याबाबतची माहिती ट्विट करुन दिली होती. जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही! पाकिस्तानचा खोटारडेपणा पाठीत खंजीर खुपसायची सवय जडलेल्या पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. नजरचुकीनं नियंत्रण रेषा ओलांडून सीमेपलीकडे गेलेले चंदू चव्हाण आमच्याकडे नाही असा कांगावा आता पाकिस्ताननं सुरू केला आहे. मात्र पाकिस्तानच्या लष्करानं केलेल्या एका ट्वीटमुळं पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडलं आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर दावे-प्रतिदावे भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दावे-प्रतिदावे सुरु आहेत. ताब्यात घेतलेला जवान सर्जिकल स्ट्राईकमधील असल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. मात्र भारताने हा दावा फेटाळला आहे. चंदू चव्हाण यांचा सर्जिकल स्ट्राईकशी संबंध नसून नगरचुकीने त्यांनी एलओसी पार केली, असं स्पष्टीकरण भारताने दिलं आहे.

फोटो : आमच्या शूर सैन्याला सलाम : अदनान सामी

कोण आहेत चंदू चव्हाण? चंदू चव्हाण हे मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचे आहेत. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाले होते. 22 वर्षीय चंदू यांनी दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदू यांचा मोठा भाऊ भूषणदेखील मिलिट्रीमध्ये आहे. ते सध्या 9 मराठा रेजिमेट कार्यरत आहेत.

फोटो : भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो: अक्षय कुमार

धक्क्याने आजीचाही मृत्यू चंदू चव्हाण लहान असतानाच त्यांच्या डोक्यावरुन आई-वडिलांचं छत्र हरवलं. त्यामुळे चंदू आणि त्याचा भाऊ भूषण यांचं पालनपोषण आजी-आजोबांनी केलं. आजी-आजोबा भूषण चव्हाण यांच्यासोबत गुजरातमधील जामनगर इथे राहतात. चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचं वृत्त आल्यानंतर आजीचं धक्क्याने निधन झालं. संबंधित बातम्या : पाकचा खोटारडेपणा, आता म्हणतात चंदू चव्हाण आमच्याकडे नाहीच! 22 वर्षांचा चंदू चव्हाण, भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान धुळ्याचा धुळ्याचा जवान पाकच्या ताब्यात, बातमी समजताच आजीचा मृत्यू होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय? चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द पाकमधील भारतीय उच्चायुक्तांना पाक परराष्ट्र मंत्रालयाचं बोलावणं मोदी आणि भारतीय जवानांकडून पितृपक्षात पाकचं श्राद्ध : राज ठाकरे सर्जिकल स्ट्राईक: भारतीय जवान नेमके कसे घुसले? भारत-पाक युद्ध झाल्यास… दोन्ही देशांची शस्त्रसज्जता किती? ही कारवाई उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, कुटुंबीयांची भावना भारत कणखर, मोदींचा अभिमान, मुख्यमंत्र्यांचं ट्वीट अभिनंदन मोदीजी… उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष फोटो : भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो: अक्षय कुमार फोटो : सर्जिकल स्ट्राईक: असा घेतला उरीचा हल्ल्याचा बदला! फोटो : भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्जः डीजीएमओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget