एक्स्प्लोर
11 मजली इमारतीवरुन उडी मारुनही खरचटलं नाही!
जियांगसू (चीन) : चीनमध्ये एका तरुणाने अकरा मजली इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचं म्हणजे या घटनेत तरुण आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. चीनच्या जियांगसू प्रांतातील यांगोझोऊमध्ये ही घटना घडली.
तरुणाचं हे कृत्य मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे. हा तरुण इमारतीच्या गच्चीवर उभा असल्याचं या दृश्यात दिसत आहे.
तरुण आत्महत्येच्या प्रयत्नात असताना त्याचे कुटुंबीय आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी उपस्थित होते. कुटुंबीय आणि पोलिस दोन तास त्याची समजूत काढत होते. मात्र तरीही त्याने उडी मारली. सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.
एकीकडे त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यादरम्यान अग्निशमन दलाचे जवानही तिथे दाखल झाले. हा तरुण कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता हे स्पष्टपणे दिसत होतं. त्यामुळे अग्निशमक दलाने इमारतीखाली एक हवेची उशी तयार केली, जेणेकरुन उडी मारल्यास तरुणाला इजा होऊ नये.
तरुण कोणाच्याही समजुतीला जुमानला नाही आणि त्याने इमारतीवरुन उडी मारली. सुदैवाने तो खाली असलेल्या उशीवर पडल्याने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement