एक्स्प्लोर
गांजाला कायदेशीर मान्यता देणारा कॅनडा दुसरा देश
यापूर्वी फक्त उरुग्वे देशात गांजा कायदेशीर होता.

ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या घोषणेनुसार देशात गांजाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. गांजाच्या वापरास अधिकृत परवानगी देणारा कॅनडा हा दुसराच देश ठरला आहे. वैद्यकीय मारिजुआना यापूर्वीच कॅनडात कायदेशीर असून आता ड्रग म्हणूनही तिथे गांजाला परवानगी मिळाली. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत गांजा (मारिजुआना) कायदेशीर करण्याची घोषणा ट्रुडो यांनी केली होती. त्यानुसार 17 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली. रात्री 12 च्या ठोक्याला दुकानांमध्ये गांजाची विक्रीही सुरु झाली. यापूर्वी फक्त उरुग्वे देशात गांजा कायदेशीर होता. आता कॅनडा हा गांजा अधिकृत करणारा दुसरा आणि सर्वात मोठा देश ठरला आहे. अभिनेता उदय चोप्रानेही भारतात गांजा कायदेशीर करण्याची मागणी केली होती, त्यानंतर मुंबई पोलिसांसह ट्विटराईट्सनी त्याचा समाचार घेतला होता. संघटित गुन्हेगारांचे खिसे भरण्यापासून रोखण्यासाठी गांजाची विक्री अधिकृत करण्यात आल्याचं पंतप्रधान ट्रुडो यांनी जून महिन्यात सांगितलं होतं. बार किंवा हॉटेल गांजाची विक्री करता येणार नाही, मात्र सरकारी दुकानांमध्ये नागरिकांना गांजा खरेदी करता येईल.
Oh-Can-na-bis! Recreational Marijuana becomes legal tomorrow in Canada.https://t.co/BBcUmzWnlN @freep pic.twitter.com/JlWSSaFuQe
— John Wisely (@Jwisely) October 16, 2018
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























