(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Trending : अब्जाधीशाच्या मुलीने चोरीला गेलेले दागिने परत मिळवण्यासाठी दिली 57 कोटींची ऑफर! दागिन्यांची किंमत जाणून व्हाल आश्चर्यचकित
Trending News : अब्जाधीशाच्या मुलीने म्हटलंय, जो कोणी चोरी झालेल्या दागिन्यांची माहिती देईल, त्याला दागिन्यांच्या किंमतीपैकी 25 टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल.
Trending News : ब्रिटीश अब्जाधीशाच्या मुलीने आपले चोरीचे दागिने परत मिळवण्यासाठी चक्क करोडोंची ऑफर दिली आहे. ती म्हणाली की, जो कोणी चोरी झालेल्या दागिन्यांची माहिती देईल, त्याला दागिन्यांच्या किंमतीपैकी 25 टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल.
ब्रिटिश इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी
ब्रिटिश अब्जाधीश आणि फॉर्म्युला वनचे मालक बर्नी एक्लेस्टोन यांची मुलगी, तमारा एक्लेस्टोन हिने तिचे दागिने मिळवण्यासाठी मोठे बक्षीस जाहीर केले आहे. तिने सांगितले की, 2019 मध्ये लंडनमधील तिच्या घरातून 31 मिलियन डॉलर (247 कोटी रुपये) किंमतीचे दागिने चोरीला गेले होते. ब्रिटिश इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी असल्याचे मानले जात आहे. आता तमाराने तिचे दागिने परत मिळवण्यासाठी $7.2 मिलियन म्हणजेच 57.5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
इन्स्टाग्रामवर बक्षीस जाहीर
तमारा म्हणाली, चोरांनी आधी घराची सुरक्षा व्यवस्था तोडली, त्याने प्रत्येक खोलीची झडती घेतली आणि सर्व मौल्यवान वस्तू घेऊन गेले. त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना आतापर्यंत यश आलेले नाही. तमाराने इंस्टाग्रामवर लिहिले, जर कोणी चोरीच्या दागिन्यांची माहिती दिली तर त्याला दागिन्यांच्या किमतीच्या 25 टक्के बक्षीस दिले जाईल. हे दागिने $31 दशलक्ष किंमतीचे असल्याने सुमारे $7.2 दशलक्ष किंवा रु 57 कोटी पेक्षा जास्त असेल.
आता ते दागिने कधीच मिळणार नाही असं दिसतंय - तमारा
तमाराच्या म्हणण्यानुसार, चोरीच्या दागिन्यांमधून फक्त एक कानातली अंगठी सापडली आहे, जी जानेवारी 2020 मध्ये स्टॅनस्टेड विमानतळावर एका महिलेकडून जप्त करण्यात आली होती. ती म्हणाली की, चोरी झाल्यापासून माझ्या कुटुंबीयांनी ते दागिने कधीच पाहिले नाहीत आणि आता पुढेही मिळण्याची आशा नाही. चोरीला गेलेल्या मालाची किंमत त्यांच्या बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचे तिने सांगितले
फिरायला गेले होते कुटुंब
तमाराच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2019 मध्ये ती पती जे रटलँड आणि मुलगी सोफियासोबत फिनलँडला गेली होती. यादरम्यान चोरट्यांनी केनिंगस्टन पासेस गार्डनमधील त्यांच्या घरात प्रवेश केला आणि सर्व मौल्यवान वस्तू पळवून नेल्या. यामध्ये दागिने आणि घड्याळांचा समावेश होता. पोलिसांनी घरफोडी टोळीतील तीन सदस्यांना अटक केली आणि नोव्हेंबर 2021 मध्ये तुरुंगात पाठवले, परंतु सर्बियन सरकारने चौथ्या व्यक्ती, डॅनिल वुकोविचचे सर्बियाकडे आत्मसमर्पण करण्यास नकार दिला, त्यामुळे लंडनमध्ये खटला चालवता आला नाही.