संकटकाळात ऋषी सुनक यांना 'भगवद्गीते'मधून ऊर्जा, जन्माष्टमीनिमित्त ब्रिटनमधील ISKCON मंदिराला दिली भेट
Rishi Sunak : ऋषी सुनक यांची हिंदू धर्मावर श्रद्धा असून ते दर रविवारी मंदिरात जातात. श्रीकृष्ण जन्माष्ठमीनिमित्ताने त्यांनी इस्कॉन (ISKCON) मंदिराला भेट दिली.

लंडन: ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असलेल्या भारतीय वंशाच्या ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची हिंदू धर्मावर अपार श्रद्धा असून ती वेळोवेळी त्यांच्या कृतीतून दशर्वते. गुरुवारी जन्माष्टमीनिमित्त त्यांनी हर्टफोर्डशायरमधील इस्कॉनच्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं. ज्या ज्या वेळी आपल्यावर संकटं येतात त्या त्या वेळी भगवद्गीतेमधून (Bhagavad Gita)आपल्याला उर्जा मिळत असल्याचं ऋषी सुनक यांनी सांगितलं आहे. ऋषी सुनक यांनी खासदारपदाची शपथ ही गीतेवर हात ठेऊन घेतली होती. तसेच ते दर रविवारी मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जातात.
ऋषी सुनक यांनी हर्टफोर्डशायरमधील इस्कॉनच्या मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती होत्या. यावेळी त्यांनी गोमातेचं पूजन केलं. अक्षता मूर्ती या इन्फोसिसच्या सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या कन्या आहेत. हर्टफोर्डशायरमध्ये इस्कॉनचे भक्तीवेदांत मंदिर असून ते 78 एकर जागेवर पसरले आहे. या परिसरात सुंदर बाग आहे. तसेच मंदिराच्या या परिसरात गोशाळाही आहे. श्रीकृष्ण जन्माष्ठमीनिमित्ताने या मंदिरात दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
Rishi Saunak and his Wife Perfoming Gau Mata Pooja In Uk ❤️ pic.twitter.com/LoEbUecC3w
— 𝖲𝖺𝗇𝖺𝗍𝖺𝗇 𝖳𝖺𝗅𝗄𝗌™ (@SanatanTalks) August 22, 2022
इस्कॉन मंदिराच्या वतीने सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, "ऋषी सुनक यांनी मंदिराला दिलेल्या भेटीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. जन्माष्टमीच्या काळात सुमारे 1500 स्वयंसेवकांनी या काळात परिश्रम घेतले. त्यांच्या या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो." ऋषी सुनक यांनी या भेटीवेळी संकटकाळात भगवद्गीतेतून आपल्याला उर्जा मिळते असं सांगितल्याचा उल्लेखही त्यामध्ये करण्यात आला आहे.
Today I visited the Bhaktivedanta Manor temple with my wife Akshata to celebrate Janmashtami, in advance of the popular Hindu festival celebrating Lord Krishna’s birthday. pic.twitter.com/WL3FQVk0oU
— Rishi Sunak (@RishiSunak) August 18, 2022
महत्त्वाच्या बातम्या:























