Kohinoor: ब्रिटनची नवी महाराणी राज्याभिषेकावेळी नाही घालणार कोहिनूरचा मुकुट, मग आता कोहिनूरचे काय?
Kohinoor: ब्रिटनचा नवा राजा तिसरा किंग चार्ल्स आपल्या राज्याभिषेकावेळी एक खास मुकुट घालणार आहे. या मुकुटाचे नाव आहे सेंट एडवर्ड्स मुकुट. या मुकुटाला सध्या लंडन टॉवरमध्ये ठेवले आहे.
Kohinoor: ब्रिटनचा नवा राजा (Britan King) तिसरा किंग चार्ल्स (Third king charles) याचा सहा मे रोजी राज्याभिषेक होणार आहे. त्याचवेळी किंग चार्ल्सची पत्नी कॅमिला(Queen Camilla) हिला ब्रिटनची राणी म्हणून घोषित केले जाईल. मात्र यावर्षी ब्रिटनच्या राजघराण्याने एक निर्णय घेतला आहे. या राज्याभिषेकावेळी ब्रिटनची नवी राणी कोहिनूरचा(Kohinoor) मुकुट घालणार नाही. हा कोहिनूर हिरा राणी एलिझाबेथ घालत होती. भारताचं नाव पुढे करत हा मुकुट न घालण्याचं कारण सांगितलं जात आहे. भारताने सध्या कोहिनूर हिरा परत आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे या राज्याभिषेकावेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये अशी ब्रिटनच्या राजघराण्याची इच्छा आहे. म्हणूनच राज्याभिषेकावेळी ब्रिटनची नवी राणी कोहिनूर हिऱ्याचा मुकुट घालणार नसल्याचं कारण सांगितलं जात आहे.
मग राणी कोणता मुकुट घालणार?
तिसऱ्या किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकावेळी ब्रिटनची नवी राणी कॅमिला ही कोहिनूरचा मुकुट नाही तर राणी मेरीचा मुकुट घालणार आहे. ब्रिटनच्या राजघराण्याकडून असं सांगण्यात येत आहे की, हा मुकुट पर्यावरणाला अनुकुल असून यामध्ये कार्यक्षमता पूर्ण करण्याची ताकद आहे.
तिसरा किंग चार्ल्स 'हा' मुकुट घालणार
आपल्या राज्याभिषेकावेळी किंग चार्ल्स एक विशेष असा मुकुट घालणार आहे. या मुकुटाचे नाव सेंट एडवर्ड्स असे आहे. या मुकुटाला किंग चार्ल्सच्या मापानुसार तयार करण्यात आले आहे. सध्या हा मुकुट लंडन टॉवरमध्ये ठेवण्यात आलेला आहे. हा मुकुट 1661 मध्ये दुसऱ्या किंग चार्ल्ससाठी बनवण्यात आला होता. त्यानंतर ब्रिटनच्या गादीवर बसणाऱ्या प्रत्येक राजाला हा मुकुट घालण्यात येतो.
कोहिनूरचा नेमका वाद काय?
कोहिनूर हा जगातील सर्वात मोठा आणि सुंदर असा हिरा आहे. असं म्हटलं जातं कि या हिऱ्याचा जन्म भारतात झाला होता. त्यानंतर हा हिरा इराणचा बादशाहा नादिर शाहा याच्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर 1739 च्याजवळ भारतातील राजांनी पुन्हा भारतात आणला. पण 1846 मध्ये जेव्हा इंग्रजांनी पंजाबवर विजय मिळवला तेव्हा इंग्रजांनी हा हिरा पंजाबचे महाराज दलीप सिंह यांच्याकडून हिसकावून घेतला. जेव्हा महाराजांकडून हा हिरा हिसकावून घेण्यात आला तो अवघ्या पाच वर्षांचा होता. भारताकडून लुटण्यात आलेला कोहिनूर हिरा भारताला परत करावा, अशी भारताची आजही ब्रिटनकडे मागणी आहे. आता कोहिनूर भारतात येण्यासाठीच्या प्रयत्नांनी चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे आता कोहिनूरचे नेमके भविष्य काय हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.