(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Britain : महाराणी एलिझाबेथ यांची सत्तेची 'सत्तरी'; राणी म्हणून 70 वर्षांची कारकीर्द पूर्ण
ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांनी थायंलडचा राजा भूमिबल अदुल्यादेज (Bhumibol Adulyadej) ला मागे टाकत हा ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे.
लंडन : ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth II) ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर 70 वर्षे पूर्ण करणाऱ्या पहिल्या महाराणी ठरल्या आहेत. इंग्लंड आणि राष्ट्रकुलच्या महाराणी म्हणून एलिझाबेथ द्वितीय यांच्या राज्याभिषेकाची प्लॅटिनम ज्युबिली साजरी करत आहेत. या उत्सवासाठी संपूर्ण युनायटेड किंग्डम अनेक कार्यक्रमांचे आयेजन करण्यात आले आहेत.
ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांनी थायंलडचा राजा भूमिबल अदुल्यादेज (Bhumibol Adulyadej) ला मागे टाकत हा ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे. थायलंडच्या राजाने 1927 ते 2016 या कालावधील तब्बल 70 वर्षे 126 दिवस राज्य केले होते. फ्रान्सचे चौदावे लुई हे दीर्घकाळ राज्य करणारे पहिले सम्राट आहेत. त्यांनी 1643 ते 1745 या कालावधीत म्हणजे तब्बल 73 वर्षे 110 दिवस राज्य केले होते.
1953 साली सिंहासनावर बसणारी ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सप्टेंबर 2015 साली पणजी महाराणा व्हिक्टोरिया ( Queen Victoria) यांना मागे टाकत दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ब्रिटिश सम्राज्ञी (British monarc) ठरल्या प्लॅटिनम ज्युबली समारोपाच्या कार्यक्रमानंतर महारणी एलिझाबेथ यांनी एक पत्र लिहित सर्वांचे आभार मानले आहे.
'द संडे टाइम्स' ने रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार विलियम - ड्यूक ऑफ कॅम्ब्रिज (William -- The Duke Of Cambridge) आपला 40 वा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी ते आपल्या परिवारासोबत लंडनहून (London)बर्कशायर (Berkshire) जाणार आहे.