Kabul Blast Update: काबूल विमानतळाजवळील निवासी भागात रॉकेट हल्ला, अफगाणिस्तानात परिस्थिती चिंताजनक
Kabul Blast: काबुल शहरात मोठा स्फोट, दूरपर्यंत आवाज ऐकू आला.
Kabul Blast: काबूल शहरात मोठा स्फोट झाला आहे. काबूल विमानतळाजवळील खाजेह बागरा या निवासी भागातील एका घरावर रॉकेट डागण्यात आले आहे. ज्या घरावर हे रॉकेट पडले त्या घरात एका मुलाचा मृत्यू झाला असून तीन जखमी असल्याची माहिती आहे. अफगाण माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉकेट घरावर पडले. घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. लोक इकडे तिकडे धावत आहेत. स्थानिक पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकला गेला आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी काबूल विमानतळावर दोन सीरियल स्फोट झाले होते ज्यात 170 लोक मारले गेले होते.
अमेरिकेने आधीच सतर्क केले होते
हा रॉकेट हल्ला अशा वेळी झाला जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इशारा दिली होता की दहशतवादी पुन्हा एकदा काबुल विमानतळाला पुढील 24 ते 36 तासांमध्ये लक्ष्य करू शकतात. या इशाऱ्यानंतरच पुन्हा स्फोट झाला आहे.
इस्लामिक स्टेट खोरासानने 26 ऑगस्टच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
इस्लामिक स्टेट खोरासनने 26 ऑगस्ट रोजी काबूल स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातील इसिसच्या लक्ष्यांवर ड्रोन हल्ले केले. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते की, आमच्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही.
निष्पाप लोकांना लक्ष्य करणाऱ्यांना सोडणार नाही : जो बायडन
जो बायडन म्हणाले की, त्यांनी शनिवारी आपल्या नॅशनल सिक्युरिटी टीम आणि अफगाणिस्तानात उपस्थित सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बातचित केली. अमेरिकन एअरफोर्सनं अफगाणिस्तानात काबुल एअरपोर्टवर करण्यात आलेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या ISIS-K च्या तळांवर ड्रोनच्या मदतीनं बॉम्ब वर्षाव केला होता. त्यासंदर्भात चर्चा करण्यात आली असल्याची माहिती बायडन यांनी दिली. बायडन म्हणाले की, "मी सांगितलं होतं की, काबुलमध्ये निष्पाप लोकांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांना आम्ही सोडणार नाही आणि आम्ही तसं करुन दाखवलं."
ISIS वरील आमचा हा शेवटचा एअर स्टाईक नाही : जो बायडन
जो बायडन म्हणाले की, दहशतवादी संघटनेवर आमचा हा शेवटचा एअर स्ट्राईक नाही. काबुलच्या स्फोटासाठी जे कोणी जबाबदार आहेत. आम्ही त्यांच्यापैकी प्रत्येकाला शोधून काढू आणि त्यांना आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागेल. जेव्हा कोणी अमेरिकेला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. याबद्दल कोणालाही शंका नसावी. "