एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
50 वर्षापूर्वीचा हात सापडला, 1966 मध्ये कोसळलेल्या विमानाचे अवशेष आढळले
फ्रान्सच्या डॅनियल रोच यांनी, 50 वर्षापूर्वी आल्प्स पर्वतरांगात कोसळलेल्या विमानातील, प्रवाशांच्या मृतदेहाचे अवशेष शोधले आहेत.
पॅरिस: विमान अपघातांचा अभ्यास करणाऱ्या एका संशोधकाने अजब रहस्याचा उलगडा केला आहे. फ्रान्सच्या डॅनियल रोच यांनी, 50 वर्षापूर्वी आल्प्स पर्वतरांगात कोसळलेल्या विमानातील, प्रवाशांच्या मृतदेहाचे अवशेष शोधले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे डॅनियल यांनी शोधलेल्या मृतदेहांचे अवशेष, हे एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांचे असण्याची दाट शक्यता आहे. डॅनियल यांना आढळलेल्या अवशेषांमध्ये महिलेचा हात आणि एका व्यक्तीच्या पायाचे अवशेष आहेत.
1966 मध्ये एअर इंडियाचं बोईंग 707 हे विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जात होतं. त्यावेळी ते आल्प्स पर्वतरांगात कोसळलं. या थरारक अपघातात, विमानातील सर्व 117 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. पण धक्कादायक म्हणजे यापैकी एकाही प्रवाशाचा मृतदेह हाती लागला नव्हता. पण डॅनियल रोच यांनी आता याचा शोध लावला आहे.
मात्र सापडलेले अवशेष हे 1966 मध्ये कोसळलेल्या विमानातील प्रवाशांचेच आहेत का, याबाबत त्यांना साशंकता आहे.
कारण याच परिसरात 1950 मध्येही एअर इंडियाचंच विमान कोसळलं होतं. त्या विमानात 48 प्रवासी होते. त्या सर्व प्रवाशांचाही अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे सापडलेले अवशेष नेमके कोणत्या विमानातील आहेत, याबाबत आता डॅनियल संशोधन करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement